नवी दिल्ली : आजकाल ट्रोलिंगचा जमाना आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरु नये. कारण ट्रोलर्स कोणाला, कधी आणि कशावरून ट्रोल करतील, याचा काही नेम नाही. सध्या ट्रोलर्सने अभिनेत्री राधिका आपटेवर निशाणा साधला. राधिकाने अलिकडेच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तो फोटो पाहुन ट्रोलर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
राधिकाने बीचवरील बिकीनीमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यात तिने बिकनी घातली आहे. एका फ्रेंडसोबतचा हा फोटो गोवा बीचवरील आहे. हे इतकंच कारण ट्रेलर्सला ट्रोल करण्यासाठी पुरेसं आहे.
यावर राधिकाला विचारले असता ती म्हणाली की, आधी मला माहितच नव्हते की मी ट्रोल होते आहे. मला कोणीतरी त्याबद्दल सांगितले तेव्हा मला कळले. हे अत्यंत वाईट आहे. लोकांची काय इच्छा आहे की बीचवर मी साडी नेसू?
ट्रोल होणारी राधिका आपटे ही पहिली सेलिब्रेटी नव्हे यापूर्वी प्रियंका चोप्रा, तापसी पन्नू, ईशा गुप्ता, दीपिका पदुकोण, परिणीती चोप्रा यांनाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या पॅडमॅन सिनेमात राधिका आपटे प्रमुख भूमिकेत होती. त्यातील राधिकाच्या काम लोकांच्या चांगलेच पसंतीस पडले.