मुंबई : अभिनेत्री रेखा आणि बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यातील नात्याबद्दल कोणाला माहित नाही. या दोघांमधील नातं एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाच चर्चेचा विषय होता. परंतु त्यानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी लग्न केलं. ज्यामुळे रेखा आणि बिग बी यांच्या नात्यांच्या चर्चेरा पूर्णविराम लागला. रेखा आणि अमिताभ बच्चन त्याकाळचे सगळ्यास नावाजलेले आणि सक्सेसफुल सेलिब्रिटींपैकी एक होते.
अमिताभ बच्चन यांनी कधीही आपल्या प्रेमाबद्दल काहीच वक्तव्य केलं नाही. त्यांना कधीही रेखा सोबतच्या नात्याबद्दल विचारले की, ते त्यावर गप्पच बसायचे. परंतु रेखा मात्र आपलं प्रेम कबुल करण्यात मागे हटल्या नाही.
त्यांनी वेळोवेळी, कधी डायरेक्ट तर कधी इनडायरेक्ट आपलं अमिताभ बच्चन वरील प्रेमाची कबुली दिली.
रेखा यांनी 1984 मध्ये एका मुलाखतीदरम्यान अमिताभसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखाने या मुलाखतीत अमिताभ आणि त्यांच्यासोबत त्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे मान्य केले होते. अभिनेत्रीने सांगितले की, 'त्यांच्या इमेज आणि मुलांसाठी त्यांनी कधीही लोकांसमोर हे नाते स्वीकारलं नाही. लोक काय विचार करतात, यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही.' याशिवाय रेखा पुढे म्हणाल्या, 'लोकांना माझ्याबद्दल आणि त्यांच्या प्रेमाबद्दल आणखी काय कळायला हवं आहे? अम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो हे पुरेसं नाही का?'
एव्हरग्रीन अभिनेत्री पुढे म्हणाली, 'लोकांनी मला गरीब, वेडे म्हटले असेल. पण अमिताभचे 10 लोकांशी संबंध नव्हते. ते खूप चांगला व्यक्ती आहे. ते कोणाचेही मन दुखवू शकत नाही. मग सगळ्यांसमोर काही बोलून तो बायकोला कसा दुखावणार?'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन आणि रेखा 'गंगा की सौगंध' चित्रपटात एकत्र काम करत असताना सेटवर एका सहकलाकाराने रेखासोबत गैरवर्तन केले. यावर बिग बी चांगलेच संतापले. या घटनेनंतर दोघांच्या प्रेमाची सर्वांनाच कल्पना आली होती.