Divorce नंतर समंथाचं मोठं पाऊल; Naga Chaitanya च्या काळजावर आणखी एक वार

 समंथा स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. 

Updated: Oct 28, 2021, 04:10 PM IST
Divorce नंतर समंथाचं मोठं पाऊल; Naga Chaitanya च्या काळजावर आणखी एक वार

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या चार वर्षांच्या वैवाहिक नात्याला संपवत ही बातमी जाहीर केली. आपण या नात्यातून विभक्त होत असल्याचं या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. 

समंथानं तिच्या आयुष्यात आलेल्या या वादळाला मोठ्या धीरानं तोंड दिलं. असं असलं तरीही ती मनातून मात्र खचली होती.

मानसिक शांततेसाठी मग तिनं बद्रीनाथ धाम, हृषिकेश या ठिकाणांना भेट दिली. ज्यानंतर आता समंथानं आणखी एक गंभीर पाऊल उचललं. 

समंथाच्या या निर्णयानं नागा चैतन्यच्या काळजावर आणखी एक वार झाला असणार यात शंका नाही. 

नागा चैतन्य याच्याशी विभक्त झाल्यानंतर समंथानं आतापर्यंत तिच्या अकाऊंटवर असणाऱे काही फोटो समंथानं डिलीट केले आहेत. 

आतापर्यंत त्यांच्या लग्नातील काही फोटो तिच्या वॉलवर दिसत आहेत. पण, काही निवडक फोटो मात्र तिनं डिलीट केले आहेत. 

बहुधा आता नागा चैतन्यसोबतच्या आठवणींपासूनही समंथा दुरावाच पत्करणं फायद्याचं समजत आहे हेच तिची ही कृती सांगून जात आहे.