Ahsaas Channa Sex Change Reality: बॉलिवूड ही अशी इंडस्ट्री आहे ज्यामध्ये असे अनेक कलाकार आहेत जे लहानपणापासून काम करत आहेत. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत पॉप्यूलर आहेत. अशीच एक अभिनेत्री या लिस्टमध्ये सहभागी आहे. लहानपणीच आपल्या जबरदस्त एक्टिंगमुळेच खूप काही ऐकून घेतलं आहे. या अभिनेत्रीने शाहरुख खान सोबतही काम केलं आहे आणि आज सिनेमा आणि ओटीटीच्या दुनियात एक मोठं नाव आहे. मात्र आपल्या चांगल्या कामावरही लोकांनी तिला घृणास्पद गोष्टी ऐकवल्या आहेत. तिने हे अनेकदा ऐकलं आहे- 'वयाच्या सहाव्या वर्षी लिंग बदललं. असे अनेक प्रकारचे आरोप अभिनेत्रीवर लावण्यात आले आहेत.
या बॉलिवूड अभिनेत्रीवर लावले गेले घाणेरडे आरोप
आज आम्ही बोलत आहोत, 'कभी अलविदा न कहना'मध्ये शाहरुख खानच्या मुलाचा रोल साकारणारी अभिनेत्री अहसास चन्नाबद्दल बोलत आहोत. तिने बऱ्याच सिनेमात मुलगी असूनही मुलाचा रोल साकारला आहे. मात्र यावरुन तिला खूप सुनवलं गेलं.
लोक म्हणायचे, वयाच्या सहाव्या वर्षी लिंग बदलून...
एका मुलाखतीदरम्यान, अहसास चन्नाने स्वतः खुलासा केला होता की, तिने तिच्या बालपणात मुलांची भूमिका केली होती, कारण ती मुलगी म्हणून बाहेर आली तेव्हा लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. अशा परिस्थितीत, तिला अनेक लोकांकडून हे ऐकावं लागलं आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही लिहिलं गेलं आहे की, अहसास चन्ना लहानपणी मुलगा होता पण नंतर वयाच्या सहाव्या वर्षी लिंग बदलून ती मुलगी झाली. हे पाहून ती इतकी प्रभावित झाली की तिने मुलाची भूमिका करणं बंद केलं.
आम्ही तुम्हाला सांगतो की, अहसास चन्नाने 'ओह माइ फ्रेंड गणेशा', 'देवों के देव महादेव', 'कोटा फैक्ट्री' आणि 'हॉस्टल डेज'सारख्या सिनेमात पाहिलं गेलं आहे. अहसास बऱ्याच यूट्यूब व्हिडिओमध्ये दिसत असते.