20 वर्षांनी समोरासमोर येताच, रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया; पाहा नक्की काय घडलं

Rekha and Shatrughan Sinha Viral Video :  रेखा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तब्बल 20 वर्षे जुना वादानंतर आता एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 29, 2023, 10:51 AM IST
20 वर्षांनी समोरासमोर येताच, रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया; पाहा नक्की काय घडलं title=
(Photo Credit : Viral Bhayani)

Rekha and Shatrughan Sinha Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री रेखा या सगळ्यात सुंदर आणि टॅलेंटेंड अभिनेत्रींपैकी एक आहेत. वयाच्या 69 व्या वर्षी देखील त्या त्यांच्या सुंदरेसाठी चर्चेत असतात. रेखा यांचे आजही लाखो चाहते आहेत. त्या कधीही कुठेही दिसल्या तरी चर्चेत राहतात. आता आणखी पुन्हा एकदा तसंच झालं जेव्हा एका कार्यक्रमात रेखा यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना पाहताच त्यांचा आशीर्वाद घेतला. 

रेखा आणि शत्रुघ्न सिन्हा या दोघांनी खरंतर विजक्राफ्ट इंटरनॅशन्ल प्रायव्हेट लिमिटेड के सह-संस्थापक आंद्रे टिमिन्स यांच्या मुलाचे लेस्ली टिमिन्सच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत हजेरी लावली होती. आंद्रे टिमिन्सच्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या दरम्यानस शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत तिथे दिसले. जेव्हा त्यांची आणि रेखा यांची भेट झाली त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात शत्रुघ्न सिन्हा यांनी रेखा यांना मिठी मारली. तर रेखा यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. हा क्षण पापाराझींनी कॅप्चर केला आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, अनेकांना वाटलं असेल की यात काय वेगळं आहे. शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा या दोघांमध्ये राकेश रोशन यांच्या 'खून भरी मांग' या चित्रपटा दरम्यान, वाद झाला होता. जवळपास 20 वर्षे ते दोघे एकमेकांशी बोलतच नव्हते. याविषयी शत्रुघ्य सिन्हा यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केलं होते. झूमला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की त्यांचं वेगळं मत आहे. त्यांनी हे देखील स्विकारले की जेव्हा त्यांचं कोल्ड वॉर सुरु होतं तेव्हा त्यांनी रेखा यांच्या विषयी काही अनपेक्षित कमेंट केले होते. इतकंच नाही तर रेखा यांच्या सोबत झालेल्या त्यांच्या भांडणामुळे त्यांची पत्नी आणि रेखा यांच्या मैत्रीत प्रॉब्लम्स झाले होते.  

हेही वाचा : 'मी आत्महत्या करायला गेले अन्...', 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

रेखा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'ही नेहमीच नवरीसारखी साडी का नेसते? ही सिंपल साडी आणि कमी दागिन्यांमध्ये देखील सुंदर दिसते.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'रेखा यांच्यासाठी आणखी आदर वाढला आहे.'