जेव्हा आराध्या दुसऱ्याच अभिनेत्याला आपला 'बाबा' समजते, ऐश्वर्या रायने सांगितला 'तो' किस्सा

Aradhya Bachchan Hugged Ranbir Kapoor: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत असते. कान्स चित्रपट महोत्सवातही (Aradhay Bachchan at Cannes) तिनं हजेरी लावली होती. तिच्या ड्रेसचे अनेकांनी कौतुक केले परंतु ती त्यावरून ट्रोलही झाली. सजध्या तिनं सांगितलेला एक जूना किस्सा चांगलाच व्हायरल होता आहे. 

जेव्हा आराध्या दुसऱ्याच अभिनेत्याला आपला 'बाबा' समजते, ऐश्वर्या रायने सांगितला 'तो' किस्सा
फाईल फोटो

Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा विविध कारणांसाठी लोकप्रिय असते. नुकतीच तिनं कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी ती तिच्या ड्रेसमुळे ट्रोल झाली होती. तिनं यावेळी शिमरचा ड्रेस घातला होता. डोक्यावर हुडीच्या आकाराची कॅप तिनं परिधान केलेली होती. त्यामुळे तिच्या या ड्रेसची चांगलीच चर्चा रंगली होती. कान्स चित्रपट महोत्सवात (Aishwarya Rai Bachchan at Cannes) काहीतरी भन्नाट घडलं नाही तरच नवल. यावेळी या कान्स चित्रपट महोत्सवात सेलिब्रेटींनी हटके आऊटफिट घालून कान्स चित्रपट महोत्सवात चार चांद लावले होते. यावेळी ऐश्वर्यानंही आपली जादू दाखवली होती. परंतु आता ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या तिचा एका जूना किस्सा व्हायरल होतो आहे. 

2016 साली आलेल्या 'ए दिल हैं मुश्किल' या चित्रपटाभोवती वादाचे वर्तुळ तयार झाले आहे. यामध्ये रणबीर आणि ऐश्वर्याचे अनेक इंटिमेट सीन्स (Aishwarya Rai Intimate Scene) होते. त्यावरून बराच गदारोळ उठला होता. या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली होती. खुद्द जया बच्चन यांनीही या चित्रपटावरून टीका केली होती. या चित्रपटाचे प्रकरण बरेच गाजले होते. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भुमिका होत्या. या चित्रपटातील गाणीही बरीच गाजली होती. 

हेही वाचा - तो धावत आला अन् सलमानला मिठीच मारली, VIDEO नं जिंकली लाखोंची मनं

या चित्रपटामुळे रणबीर आणि ऐश्वर्या बरेच चर्चेत आले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 7 वर्षे होऊन गेली आहेत परंतु या चित्रपटाची कॉन्ट्रोव्हर्सी अनेकदा चर्चेत येते. परंतु रणबीर आणि ऐश्वर्या अजून एका कारणासाठी चर्चेत आले होते आणि तेही आराध्यामुळे. आराध्या बच्चनचा एकेकाळचा किस्सा ऐश्वर्यानं आपल्या मुलाखतीतून मांडला होता. फिल्मफेअरशी बोलताना ऐश्वर्यानं सांगितले होते की, ''एकदा आराध्या ही रणबीरलाच चुकून आपले वडिल समजून बसली होती.''

तिनं पुढे सांगितलं की, ''एके दिवशी आराध्या धावत धावत रणबीरच्या (Ranbir Kapoor and Aardhya Bachchan) मांडीवर जाऊन बसली होती. यावेळी त्यानंही अभिषेकप्रमाणे जॅकेट घालते होते. तिला वाटलं की तो अभिषेक आहे म्हणजेच आपलेच वडिल आहेत. त्यानंतर आराध्या थोडी रणबीरसोबत राहायला लाजू लागली. त्यानंतर अभिषेकही रणबीरला अनेकदा चिडवू लागला होता.'' हा किस्सा बऱ्याचदा चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा याची आठवण होते आहे.