लग्नाआधीचं Aishwarya Rai लावायची सिंदूर, जुना फोटो समोर येताचं चर्चांना उधाण

लग्नाआधीचं Aishwarya Raiच्या सिंदूरने वेधलं सर्वांचं लक्ष, अनेक वर्षांनंतर फोटो समोर आल्यामुळे खळबळ  

Updated: May 13, 2022, 12:00 PM IST
लग्नाआधीचं Aishwarya Rai लावायची सिंदूर, जुना फोटो समोर येताचं चर्चांना उधाण  title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. ऐश्वर्याच्या अदा आणि अभिनयासमोर प्रत्येक अभिनेत्री फिकी आहे. ऐश्वर्याच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांची नजर असते. आता देखील ऐश्वर्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्याचा हा जुना फोटो कोरियोग्राफर फराह खानने तिच्या इन्स्टाग्रावर पोस्ट केला आहे. सध्या तिच्या या पोस्टची तुफान चर्चा रंगत आहे. 

फराहने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिग्दर्शक करण जोहर, फरहान अख्तर, राणी मुखर्जी, साजीद खान आणि ऐश्वर्या राय बच्चन दिसत आहे. पण या फोटोमध्ये ऐश्वर्या रायच्या सिंदूरने प्रत्येकाचं लक्ष वेधलं आहे. सध्या या फोटो तुफान चर्चा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

फोटो ऐश्वर्याच्या लग्नाआधीचा असल्यामुळे अभिनेत्रीने सिंदूर का लावलं आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  पण फराहचं कॅप्शन पाहून सर्वांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. 

फराहने कॅप्शनमध्ये, 'ऐश्वर्या देवदास सिनेमाच्या शुटिंग संपवून थेट पार्टीत आली होती...' असं लिहिलं आहे. अनेक वर्षांनंतर जुना फोटो समोर आल्यामुळे फोटोमध्ये असलेल्या कलाकारांना आणि त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.