मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी असते. पण त्याच्या शत्रूंची यादी देखील मोठी असते. अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण काही असे स्टार आहेत ज्यांचं अक्षयला तोंड पाहायला देखील आवडत नाही. काही असे सेलिब्रिटी आहेत ज्यांचं नाव अक्षयच्या गुड बूकमध्ये नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये अभिनेता सलमान खानचं देखील नाव आहे.
अक्षय कुमारच्या शत्रूंची यादी
सलमान खान
एक अशी वेळ होती जेव्हा दोघे चांगले मित्र होते. पण काही दिवसांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. अभिनेत्री ट्विकंलमुळे त्यांच्या नात्यात दरी निर्माण झाली असं सांगण्यात येत आहे.
फराह खान
'जोकर' चित्रपटा दरम्यान अक्षय आणि फराह यांच्यात भांडण झालं. चित्रपटातं मेकिंग अक्षयला अवडलं नसल्यामुळे तो निराश झाला. चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाच्या पतीने केले. त्यानंतर चित्रपटातं प्रमोशन करायचं नाही असा निर्णय अक्षयने घेतला.
रवीना टंडन
मीडिया रिपोर्टनुसार रवीना आणि अक्षय लग्न करणार होते. साखरपुडा झाल्यानंतर अक्षयने लग्ना करण्यास नकार दिला. त्यानंतर अक्षयने ट्विकंलसोबत लग्न केलं. खुद्द रवीनाने या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला.
अजय देवगन
अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्यातील वैर खूप जुने आहे. अजयने अक्षयवर आरोप केला होता की त्याच्यामुळे राजकुमार संतोषी त्याचे चित्रपट अनेक सीन काढून टाकतो. अक्षयचेही असेच विधान अजयसाठी केले होते.