अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमाचं पोस्टर रिलीज

मौना रॉय करतेय डेब्यू

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमाचं पोस्टर रिलीज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'गोल्ड' चं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. अक्षय कुमारच्या या सिनेमाचं पोस्टर लाँच झालं आहे. सिनेमाच्या या पोस्टरमध्ये अक्षय कुमार भरपबर सीरियस लूकमध्ये दिसत आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. 

अक्षय कुमारने हे पोस्टर रिलीज केलं आहे. भारताचा झेंडा आपल्या उराशी घेताना हा अभिनेता दिसत आहे. देशासाठी ऑलम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याची आग अक्षयच्या डोळ्यात दिसत आहे. या पोस्टरमध्ये फक्त अक्षयच नाही तर संपूर्ण हॉकी टीम दिसत आहे. या अगोदर रिलीज झालेल्या सर्व पोस्टरमध्ये फक्त अक्की दिसत होता. त्यामुळे हे पोस्टर खास आहे. शेअर करताना अक्षय म्हणतो की, देश तेव्हाच बनतो जेव्हा सगळ्या देशवासियांच्या डोळ्यात एकच स्वप्न असतं. 

या सिनेमांतून मौनी रॉय डेब्यू करत आहे. असं म्हटलं जातं की, सलमान खानच्या सांगण्यावर मौनी रॉयला घेण्यात आलं आहे.