आलियासोबत रणबीर कपूर संजय दत्तच्या घरी

पुन्हा एकदा दिसले एकत्र 

आलियासोबत रणबीर कपूर संजय दत्तच्या घरी  title=

मुंबई : रणबीर कपूर - आलिया भट्टमधील जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी हे दोघे एकत्र पाहायला मिळतात. तसेच एकमेकांच भरभरून कौतुक करताना देखील दिसतात. रणबीर कपूरच्या 'संजू' या सिनेमाची भरपूर चर्चा आहे. याअगोदर बुधवारी अगदी बिझी शेड्यूलमध्ये रणबीर कपूर संजय दत्त याच्या घरी डिनरला गेला होता. मात्र या डिनरसाठी तो एकटा गेला नव्हता. आलिया भट्ट देखील त्याच्यासोबत दिसली. आलिया बुधवारी अगोदर रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घरी दिसली त्यानंतर ते एकत्र संजय दत्त यांच्या घरी गेले. 

रणबीर कपूरने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे संजय दत्त कायम त्याच्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत. एवढंच काय तर संजय दत्त कायम रणबीरचे भरपूर लाड करतो. संजयने रणबीरला वाढदिवसादिवशी हार्ले डेविडसन मोटरसायकल गिफ्ट केली आहे. तेव्हा ऋषी कपूर संजू बाबावर भडकले की, का तो माझ्या मुलाला बिघडवत आहे. संजय दत्तकडे डिनरला रणबीर - आलियासोबत ऋषी कपूर देखील होते. 

रणबीर आलिया आणि ऋषी कपूर यांचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला. दिवसेंदिवस यांच्यातील जवळीक वाढत आहे. त्यामुळे आता रणबीर - आलियाचे फॅन्स देखील खुश झाले आहेत. 

ranbir kapoor

आता आलिया भट्ट - रणबीर कपूर आपल्याला 'ब्रम्हास्त्र' या सिनेमांत एकत्र दिसणार आहेत. या सिनेमांच पहिल शेड्युल संपल आहे. लवकरच अमिताभ यांच्यासोबत आलिया - रणबीरचं शूट सुरू होणार आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे.