मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बॉलिवूडमध्ये लोकप्रिय जोडी पैकी एक आहे. दोन्ही कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. इंडस्ट्रीमध्ये दोघेही अतिशय टॉपला आहेत. अगदी कमाईमध्येही हे दोघे सगळ्यांच्या पुढे आहेत.
यशाचा रेट पाहिला तर आलियाने रणबीरपेक्षा अधिक हिट सिनेमे दिले आहेत. असं असलं तरीही आलिया भट्ट रणबीर कपूरच्या मागेच आहेत. पाहूया कोणता कलाकार सर्वाधिक श्रीमंत आहे.
रणबीर कपूर एक उत्तम अभिनेता आहे. त्याने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एका चित्रपटासाठी तो करोडो रुपये घेतो. द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रणबीर एका चित्रपटासाठी 18 ते 20 कोटी रुपये घेतो. जीक्यू इंडियानुसार, रणबीरची एकूण संपत्ती 45 मिलियन डॉलर म्हणजेच 337 कोटी रुपये आहे.
आलिया भट्टने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. networth.co.in नुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती 21.7 मिलियन डॉलर म्हणजेच 158 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी ती 5 ते 8 कोटी फी घेते. याशिवाय ती जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करते.
रणबीर कपूरचा 'संजू' ब्लॉकबस्टर ठरला. याशिवाय त्याचे 'बर्फी', 'ये जवानी है दिवानी' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्याचबरोबर आलिया भट्टच्या यापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये 'गली बॉय', 'राझी', 'डियर जिंदगी', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि '2 स्टेट्स' यांचा समावेश आहे.
वर्क फ्रंटवर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये रणबीर कपूर एका वेगळ्या लूकमध्ये दिसला. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील आहेत. हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला असून 9 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.