आलिया भट्टने घेतली अलिशान कार

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता तिच्या जोकमुळे किंवा अॅक्टींगमुळे नाही तर तिच्या नव्या गाडीमुळे चर्चेत आली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 24, 2017, 08:13 PM IST
आलिया भट्टने घेतली अलिशान कार title=
Bollywood mantra photo

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता तिच्या जोकमुळे किंवा अॅक्टींगमुळे नाही तर तिच्या नव्या गाडीमुळे चर्चेत आली आहे.

आलियाची नवी कार

आलिया भट्टने एक नवी लक्झरी कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत आहे १.८ कोटी. एसयूवी रेंज रोवर वोग ही गाडी आलियाने खरेदी केली आहे. ही भारतात मिळणारी सर्वात महागडी एसयूवी कार आहे. 

या २ स्टार्सकडे आहे ही गाडी

ही कार बॉलिवूड अॅक्टर रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माकडे आहे. ही कार ताशी 210 किलोमीटर  वेगाने धावते. यामध्ये 3.0 लीटर वी6 टर्बो डिझेल इंजिन आहे. जे 240 बीएचपीची पावर आणि 600 एनएमचं टॉर्क जनरेट करतो. 

आलिया भट्टने जे मॉडल घेतला आहे तो लांब व्हीलबेस सोबत येतो. यामुळे मागे बसणाऱ्या व्यक्तींना जास्त जागा मिळते. आलिया भट्ट तशी तर गाड्यांच्या बाबतीत याआधी कधी इतकी पॅशनेट नाही दिसली. पण तिची गाड्यांबद्दलचं पॅशन आता ही गाडी खरेदी केल्यानंतर दिसून आली आहे.