Amir Khanच्या लेकीचा बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक अंदाज पुन्हा व्हायरल

इराचा बॉयफ्रेंड आमिर खानचा फिटनेस कोच...    

Updated: Mar 28, 2021, 11:05 AM IST
Amir Khanच्या लेकीचा  बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक अंदाज पुन्हा व्हायरल

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची  मुलगी इरा खानने फेब्रुवारी 2021रोजी बॉयफ्रेंड नूपुर शिखारेसोबत असलेल्या तिच्या नात्याला दुजोरा दिला. दोघे लव्हबर्ड्स कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून प्रचंड प्रेमही मिळतं. इराने सध्या बॉयफ्रेंडसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघे  अत्यंत जवळ दिसत आहेत. 

दोघे एकत्र वेळ व्यतीत करताना दिसत आहे. फोटो शेअर करत  तिने कॅप्शनमध्ये 'मूव्ही टाईम' असं लिहिलं आहे. सांगायचं झालं तर इराने  व्हेलेंटाईन डेच्या आधी तिच्या आणि नूपुरच्या नात्याची अधिकृत घोषणा केली.  इशा कायम बॉयफ्रेंडसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इरा एक अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची यादी फार मोठी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

कोण आहे नूपुर शिखारे ?
नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नूपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.