अमिताभ बच्चन केबीसी होस्ट करणार नाही ?

टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती'चा ९ वा सीजन अमिताभ बच्चन होस्ट करणार नाहीत. तर त्याच्या जागी दुसरा अभिनेता या शोची सूत्र सांभाळणार आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 13, 2017, 12:50 PM IST
अमिताभ बच्चन केबीसी होस्ट करणार नाही ? title=

नवी दिल्ली : टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती'चा ९ वा सीजन अमिताभ बच्चन होस्ट करणार नाहीत. तर त्याच्या जागी दुसरा अभिनेता या शोची सूत्र सांभाळणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन आहे. 
आतापर्यंत 'कौन बनेगा करोडपती'चे ८ सीजन अमिताभ यांनी होस्ट केले आणि शो अतिशय प्रसिद्ध झाला. मात्र आता त्यांची जागा त्यांचा मुलगा अभिषेक घेणार आहे. सोनीच्या अभिकृत फेसबुक पेजवर शेयर केलेल्या शो च्या प्रोमोजमध्ये अभिषेक 'न्यू सीजन लक्ष देऊन पहा, आता केबीसी होस्ट करेल तुमचा अभिषेक' असे बोलताना दिसत आहे. 

आश्चर्य वाटून घेऊ नका खरंतर अभिषेक 'केबीसी' च्या ९ व्या सिजनच्या एका एपिसोडमध्ये येणार आहे. यामध्ये तो 'प्रो कबड्डी'च्या जयपूर टीम 'पिंक पँथर्स' चं प्रमोशन करणार आहे. या एपिसोडमध्ये त्यांचे टीम मेंबर्स देखील सहभागी होणार आहेत. या एपिसोडचे शूटींग पूर्ण झाले असून हा एपिसोड अमिताभ आणि अभिषेक दोघांसाठी देखील खास असणार आहे. 

यापूर्वी देखील सीजन ४ आणि ८ मध्ये अभिषेक केबीसीमध्ये सहभागी झाला होता. सीजन ८ मध्ये त्याने त्याच्या 'हॅपी न्यू इयर' या चित्रपटाचे प्रमोशन केले होते.