close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

#Throwback: बिग बींसोबत ही अभिनेत्री कोण?

बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे.

Updated: May 17, 2019, 05:00 PM IST
#Throwback: बिग बींसोबत ही अभिनेत्री कोण?

मुंबई : बॉलिवुड महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. काही फोटो, व्हिडिओ, शायरी आणखी अनेक गोष्टी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या पेठाऱ्यांतून अनेक जुन्या गोष्टीही बाहेर येत असतात. बिग बींनी आता सोशल मीडिया अकाउंटवर एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि स्वत: बिग बी देखील आहेत. हा फोटो पोस्ट करत बिग बींनी फोटोवर हा फोटो कुणाचा आहे? असा सवाल केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चित्रपटाच्या शूटिंगचा असल्याचं समजतंय. परंतु या फोटोतील लहान मुलगी कोण आहे हे बिग बींनी सांगितल्याशिवाय लक्षातही आलं नसतं. बिग बींसोबत एक लहान मुलगी आणि एक नर्स दिसतेय. हा फोटो 1983 सालातील 'पुकार' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा  आहे. या फोटोतील ती लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवुड बेबो करिना कपूर आहे. 

या फोटोवर बिग बींनी कॅप्शनही लिहिलं आहे. 'गोव्यामध्ये 'पुकार' चित्रपटाच्या शुटिंगवेळी करिना कपूर तिच्या वडिलांसोबत रणधीर कपूर यांच्या सोबत आली होती. तिच्या पायाला जखम झाली होती आणि आम्ही त्यावर औषध लावत होतो' असं अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या फोटोतून बिग बींनी त्यांच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.