मुंबई : ईशा अंबानी-आनंद पिरामल आणि आकाश अंबानी-श्लोका मेहता यांच्या शाही विवाहानंतर सर्वांच्या नजरा अनंत अंबानी आणि मैत्रीण राधिका मर्चंट यांच्यावर आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं राधिका मर्चंटवर प्रचंड प्रेम असल्याचं वारंवार दिसून आलं. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अनंत राधिकावर फुलांचा वर्षाव करताना दिसत आहे.
2018 मध्ये होते जेव्हा राधिका मर्चेंट इशा अंबानी आणि श्लोका मेहतासोबतच्या तिच्या प्रफॉर्मेंस प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तेव्हापासून राधिका अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसत आहे. दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा एक रोमँटिक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये अनंद, राधिकावर फुलांचा वर्षाव करत आहे. अनंदने जेव्हा राधिकावर फुलांचा वर्षाव केला, तेव्हा राधिकाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखा होते. दोघे व्हिडीओमध्ये आनंदी दिसत आहेत.
कोण आहे राधिर मर्चंट
राधिक मर्चेंट उद्योगपती वीरेन मर्चेंट यांची मुलगी आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातून पॉलिटिक्स आणि अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केल्यानंतर राधिका भारतात परतली.