रणबीर कपूरच्या 'या' वागणूकीवर रश्मिका मंदान्ना नाराज, म्हणाली....

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे.

Updated: Jun 11, 2022, 01:53 PM IST
रणबीर कपूरच्या 'या' वागणूकीवर रश्मिका मंदान्ना नाराज, म्हणाली.... title=

मुंबई : नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. विशेष म्हणजे पुष्पा स्टार लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिचा सहकलाकार रणबीर कपूरबाबत मोठा खुलासा केला आहे.

खरंतर रश्मिका मंदान्ना रणबीर कपूरसोबत 'एनिमल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यापूर्वी शूटिंगचे काही फोटोही व्हायरल झाले होते. आता नुकताच रणबीरबद्दल खुलासा करताना नॅशनल क्रशने म्हटलं आहे की, त्याच्या एका कृतीमुळे ती खूप नाराज झाली आहे.

खरंतर रणबीर कपूरच्या त्या सवयीबद्दल सांगताना रश्मिका मंदान्ना म्हणाली, 'जेव्हा मी शूटिंगचा विचार करते, तेव्हा मला वाटतं की, मी रणबीर आणि संदीपसोबत किती आरामदायक काम करत आहे. रणबीर कपूर हा संपूर्ण इंडस्ट्रीतील एकमेव व्यक्ती आहे जो मला मॅडम म्हणतो. मला ते अजिबात आवडत नाही.

चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, या क्राईम ड्रामाचे दिग्दर्शन  संदीप रेड्डी वंगा करत आहेत. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानीचा सिने१ स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सद्वारे निर्मित. रणबीर आणि रश्मिका व्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील आहेत.

स्टार्सच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, 'पुष्पा' चित्रपटातून चमक दाखवणारी रश्मिका आजकाल 'एनिमल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे रणबीर पत्नी आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.