'मणिकार्णिका' च्या सेटवरून अंकिता लोखंडेने शेअर केला हा खास फोटो!

 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेली अंकिता लोखंडे आता हिंदी सिनेमातही पदार्पण करायला सज्ज झाली आहे.

Updated: Aug 26, 2017, 12:24 PM IST
'मणिकार्णिका' च्या सेटवरून अंकिता लोखंडेने शेअर केला हा खास फोटो! title=

मुंबई :  'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेली अंकिता लोखंडे आता हिंदी सिनेमातही पदार्पण करायला सज्ज झाली आहे.

कंगना रणावत सोबत 'मणिकार्णिका' या चित्रपटात अंकिता झळकणार आहे.  

हिंदी सिनेमात जम बसवण्यासाठी अंकिता एका परफेक्ट स्क्रिप्टच्या शोधात होती. बॉलिवूडमध्ये आपलं करिअर करण्यासाठी अंकिताने अनेक हिंदी मालिकांच्या ऑफर्सदेखील नाकारल्या होत्या. 
'मणिकार्णिका' या चित्रपटाचे शुटिंग हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिता तेथे पोहचली. सेटवर पोहचल्यानंतर अंकिताने तेथील पहिला फोटो सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. इंस्टाग्रामवर अंकिताने शेअर केलेल्या फोटोत ती घोड्यासोबत दिसत आहे. 

 

Progress always begins there where your comfort zone ends! meet my new friend PAKIZA #jhalkarbai#manikarnikathequeenofjhasi

A post shared by Aankita S Lokhaande (@lokhandeankita) on

'जेथे तुमचा कम्फर्ट झोन संपतो तेथून नवी गोष्ट शिकण्याची सुरूवात होते. भेटा माझ्या या नव्या मित्राला - 'पाकिजा' (ला)' असे तिने फोटोच्या खाली लिहले आहे. 
'मणिकार्णिका' या चित्रपटामध्ये अंकिता 'झलकारी' बाईची भूमिका साकारत आहे. हा ऐतिहासिक विषयावरील सिनेमा असून कंगना रणावत या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावत आहे.