हरॅसमेंटचे सीन शूट करताना अभिनेत्रींची कशी असते परिस्थिती; Archana Puran Singh चा खुलासा

Archana Puran Singh : अर्चना पुरन सिंगनं द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावलेल्या कलाकारांना याविषयी प्रश्न विचारता अभिनेत्रींना कसं वाटतं त्याविषयी सांगितलं आहे. अर्चना पुरन सिंग या एक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

दिक्षा पाटील | Updated: May 15, 2023, 03:01 PM IST
हरॅसमेंटचे सीन शूट करताना अभिनेत्रींची कशी असते परिस्थिती; Archana Puran Singh चा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Archana Puran Singh : 'द कपिल शर्मा' शो या कॉमेडी शोतील अभिनेत्री अर्चना पूरन सिंह ही नेहमीच ट्रोल होताना दिसते. अर्चना पूरन सिंह शोमध्ये नेहमीच ट्रोल होत असते. कपिल तिच्यावर सतत एकना एक जोक करताना दिसतो. तरी देखील अर्चना नेहमीच हसताना दिसते. दरम्यान, अर्चनानं नुकत्याच एका कार्यक्रमात कोणतीही अभिनेत्री जेव्हा हरॅसमेंटचे सीन देते तेव्हा तिला कसं वाटतं याविषयी सांगितलं आहे. हे सीन देताना एखादी अभिनेत्री किती अनकंफर्टेबल होते हे सांगितले. 

अर्चना पूरननं हा खुलासा 'द कपिल शर्मा शो' च्या एका एपिसोडमध्ये केला आहे. यावेळी कार्यक्रमात रजा मुराद, गोविंद नामदेव, सयाजी शिंदे आणि अभिमन्यु सिंह यांनी हजेरी लावली होती. याच वेळी अभिनेत्रींना हरॅसमेंटचे सीन शूट करताना कसं वाटतं ते सांगितलं आहे. जेव्हा अभिनेत्री एखाद्या चित्रपटात छेडछाडीचा (हरॅसमेंटचा) सीन शूट करते, तेव्हा त्या त्यात खूप अस्वस्थ झालेल्या असतात. मुलींना रफ आणि टफ जबरदस्तीवाले सीन्स करावे लागतात तेव्हा त्या नेहमीच अस्वस्थ होतात. पण एक अभिनेत्री म्हणून जेव्हा मुलींना पडद्यावर छळवणूक करणारे सीन करावे लागतात तेव्हा त्या अधिक अस्वस्थ होतात. दरम्यान या मुद्द्यावर रझा मुराद यांना असाच एक सीन आठवला जो त्यांनी अर्चना पूरण सिंहसोबत केला होता. रझा मुराद यांनी अर्चनाला सांगितले की, 'माझ्यात आणि तुझ्यात सुद्धा असाच एक जबरदस्तीवाला सीन शूट झालेला.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर अर्चना यांनी रजा मुराद यांना त्याच्यात झालेल्या सीनविषयी विचारले, ज्यात त्यांना कोणत्या अभिनेत्रीसोबत जबरदस्ती करायची होती. या प्रश्नावर अर्चनानं तिच्या अनुभव सांगितला आहे. हे सगळे कलाकार त्यांचा आगामी चित्रपट 'आजम' च्या प्रमोशनसाठी  पोहोचले होते. या चित्रपटात शेलगिल आणि इंद्रनीव सेनगुप्ता देखील दिसणार आहे. आजम अंडरवर्ल्ड गिरोहवर असलेला चित्रपट आहे आणि 19 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा : Adipurush च्या सेटवर प्रभास आणि सैफ अली खाननं देवदत्त नागेला दिली कशी वागणूक? अभिनेता म्हणाला...

दरम्यान, नुकताच द कपिल शर्मा शोमधील कलाकार भारती सिंगनं तिचा मुलगा गोलासोबत रॅम्पवॉक करताना दिसली. तर त्यावेळी कपिल शर्मानं देखील त्याच्या लेकीसोबत हजेरी लावली होती. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या. त्यावेळी कपिलच्या लेकीचा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओवर अनेक कमेंट केल्या होत्या.