मलायका अरोराच्या भूतकाळाबद्दल अर्जून कपूरचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. 

Updated: Jul 4, 2022, 09:17 PM IST
मलायका अरोराच्या भूतकाळाबद्दल अर्जून कपूरचं मोठं वक्तव्य; म्हणाला... title=

मुंबई : अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मलायका अरोरासोबतचं नाते त्याने कधीही कोणापासून लपवलेलं नाही. मलायका घटस्फोटित असून तिला एक मुलगा आहे. अशा परिस्थितीत मलायकाच्या पास्टबद्दल अर्जुनला काय वाटतं? एका मुलाखतीत त्यांनी याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार अर्जुन म्हणाला होता की, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर कधीही जास्त बोलत नाही कारण मला वाटतं की आपण आपल्या जोडीदाराच्या भूतकाळाचा आदर केला पाहिजे.

अर्जुन पुढे म्हणाला, तिला एक भूतकाळ आहे आणि मी अशी परिस्थिती देखील पाहिली आहे जिथे गोष्टी पब्लिकली समोर आल्यानंतर त्या हाताबाहेर जातात. जे चांगलं नाही कारण लहान मुलांना देखील याचा फटका बसतो. मी नेहमीच सीमारेषा ठरवण्याचा प्रयत्न करतो. मी फक्त त्या गोष्टी करतो ज्यात ती कम्फर्टेबल असते.

अर्जुन पुढे म्हणाला की, माझं नातं माझ्या करिअरच्या आड येऊ नये. होय, हे स्पष्ट आहे की, मी कधीही काहीही लपवणार नाही. आज मी बोलू शकलो कारण आम्ही आमच्या नात्याला आदर, वेळ आणि जागा दिली आहे. माझं लग्न झालं तरी मी ते लपवणार नाही. मी अद्याप याबाबत कोणतंही नियोजन केलेलं नाही, परंतु जेव्हा मी ते करीन तेव्हा मी काहीही लपवणार नाही.

मलायका आणि अर्जुन जवळपास चार वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. त्याआधी मलायका अरबाज खानची पत्नी होती पण दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मलाइकाला मुलगा अरहानची कस्टडी मिळाली आहे.