close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अर्जुन करणार 'बिग फॅट वेडिंग'

अर्जुनने त्यांच्या लग्नाबद्दल आपले मत मांडले आहे.

Updated: Nov 8, 2019, 06:04 PM IST
अर्जुन करणार 'बिग फॅट वेडिंग'

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोराच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. मलायकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अर्जुन दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये मलायकाने अर्जुनबद्दल भाष्य केले. 

तर दुसरीकडे अर्जुनने देखील त्यांच्या लग्नाबद्दल आपले मत मांडले आहे. लग्नाविषयी त्याचं मत ऐकून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. त्यानं स्पष्ट केलं आहे की तो गुपचूप लग्न करणार नाही. 

'मी सध्या लग्न करण्याच्या तयारीत नाही. लग्नाची वेळ येईल तेव्हा मी सर्वांना आमंत्रित करेल. माझ्या कुटुंबाचा विश्वास बिग फॅट वेडिंगवर आहे. त्यामुळे मला गुपचूप लग्न करण्याची परवानगी नाही.' अर्जुनच्या या वक्तव्यावरून असं साध्य होत आहे की जेव्हा अर्जुन लग्न करेल तेव्हा ही बातमी सर्वांना कळेल. 

अर्जुन सध्या 'पानिपत' चित्रपटाच्या कामांमध्ये व्यस्त आहे. ६ डिसेंबर रोजी 'पानिपत' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अर्जुन शिवाय क्रिती सेनन, संजय दत्त, मोहनीश बहल, सुहासिनी मुले, पद्मिनी कोल्हापुरे आणि जीनत अमान देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.