कार्तिक आर्यनसोबत काम करण्यावर मराठमोळा आरोह वेलणकर म्हणाला, 'माझ्याप्रमाणेच तोही...'

Aroh Welankar : आरोह वेलनकरनं त्याचा कार्तिक आर्यनसोबत 'चंदू चॅम्पियन'मध्ये काम करण्याचा कसा अनुभव होता हे सांगितलं. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 10, 2024, 03:44 PM IST
कार्तिक आर्यनसोबत काम करण्यावर मराठमोळा आरोह वेलणकर म्हणाला, 'माझ्याप्रमाणेच तोही...' title=
(Photo Credit : Social Media)

Aroh Welankar : फिल्मफेअर पुरस्कार विजेता अभिनेता आरोह वेलणकर कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'मधून बहुप्रतिक्षित बॉलिवूड पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेला आरोह आता हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या पदार्पणाच्या भूमिकेत, अभिनेता कार्तिक आर्यनच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यामुळे चित्रपटाला आणखी एक आकर्षण जोडले जाईल.

आरोहनं आपला उत्साह व्यक्त केला आणि कार्तिक आर्यनसोबत शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनचे अनुभव शेअर केले.  तो म्हणाला, 'चंदू चॅम्पियन या चित्रपटातून माझं बॉलिवूडमध्ये पदार्पण आहे आणि हा माझा पहिला हिंदी चित्रपट आहे. आम्ही महाराष्ट्रात पुणे आणि वाई येथे शूटिंग केले. मी कार्तिकचे नेहमीच कौतुक केले कारण माझ्याप्रमाणेच तोही इंजीनियरिंग बैकग्राउंडचा आहे.  कार्तिकसोबत काम करणं खूप आनंददायी होतं आणि सेटवर आम्ही वडील -मुलाचे नाते खूप चांगले सांभाळलं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तो पुढे म्हणाला, 'आमच्या संवादांव्यतिरिक्त, आमच्या समान शैक्षणिक बॅकग्राऊंडमुळे आमच्यात बरेचसे संभाषण झाले.  सेटवरचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी खास होता, पण एक आठवण उभी राहिली ती म्हणजे शूटिंगचा शेवटचा दिवस. चित्रपटाची शेवटची फ्रेम, जिथे मी आणि कार्तिक एकत्र होतो, तो विशेष संस्मरणीय होता. चित्रपटाचा भावनिक शेवट यामुळे एक क्षण निर्माण झाला जो मी आयुष्यभर जपत राहीन.'

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आरोहच्या करिअरचा हा एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. आरोहच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आरोह वेलणकरनं 'रेगे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर घंटा या चित्रपटातही तो झळकला होता. आरोहनं 'हॉस्टेल डेज', 'फनरल' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानं बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती.

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हा 'या' दिवशी करणार बॉयफ्रेंडशी लग्न! लग्नाच्या ठिकाणापासून ड्रेस कोडची चर्चा

दरम्यान 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. कबीर खान यांनी यापूर्वी 'बजरंगी भाईजान', '83', 'एक था टायगर', 'ट्युबलाईट' यांसारख्या दमदार चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे आरोहचा हा पहिला हिंदी चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.