सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

धमकीची ही पोस्ट फेसबुकच्या 'गॅरी शूटर' (Garry Shooter) नावाच्या अकाऊंटवर टाकण्यात आली होती. 

Updated: Oct 4, 2019, 01:56 PM IST
सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला अटक केली आहे. धमकीची ही पोस्ट फेसबुकच्या 'गॅरी शूटर' (Garry Shooter) नावाच्या अकाऊंटवर टाकण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख जॅकी बिश्नोई म्हणून झाली. आरोपीसोबत त्याच्या एका जोडीदाराला देखील जोधपूरच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्वाचं म्हणजे वाहनांची चोरी करताना त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

जोधपूर पोलिसांनी मीडियाला माहिती देताना असे म्हटले की, 'गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाहन चोरीचे प्रचंड घटना घडत आहेत. त्यामुळे नाकाबंधी करण्यात आली होती. याचदरम्यान या दोन आरोप्यांना ताब्यात घेण्यात आले.' चौकशीनंतर असे निष्पन्न झाले की या दोघांना केवळ प्रसिद्धीसाठी हे कृत्य केलं.'

धमकीची ही पोस्ट फेसबुकच्या 'गॅरी शूटर' (Garry Shooter) नावाच्या अकाऊंटवर टाकण्यात आली होती. 'सोपू' नावाच्या ग्रुपमध्ये ही पोस्ट हिंदीत लिहिण्यात आली असून सलमान खानला यामध्ये चेतावणी देण्यात आली होती.

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी ही पहिल्यांदा दिलेली नाही. २०१८ मध्ये गँगस्टर लॉरेसं बिश्र्नोईने सगळ्यांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलमान खानला कडक सुरक्षा देण्यात आली होती.