या कारणामुळे Ananya Pandey आणि Aryan Khan ची वाढली मैत्री

ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अनन्या पांडेची चौकशी करत आहे. 

Updated: Oct 22, 2021, 10:55 PM IST
या कारणामुळे Ananya Pandey आणि Aryan Khan ची वाढली मैत्री

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अनन्या पांडेची चौकशी करत आहे. आर्यन खानसोबत व्हॉट्सअॅप चॅट केल्यानंतर अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आहे. अनन्या आर्यन आणि सुहाना खानची खूप चांगली मैत्रीण आहे. एवढंच नाही तर आर्यन खानची आई गौरी खान आणि अनन्या पांडेची आई भावना पांडे सुद्धा खूप चांगले फ्रेंड्स आहेत.

अनन्या पांडे एका मुलाखतीत म्हणाली होती की, आर्यन आणि सुहाना खान खूप प्रतिभावान आहेत. त्यांना आयुष्यात काहीतरी मोठं करण्यासाठी बनवलं आहे. आर्यन खानला दिग्दर्शनात रस आहे, तो त्यात खूप चांगलं काम करेल.  याशिवाय तो एक चांगला लेखकही आहे. आर्यन आणि अनन्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसले आहेत. आर्यन सोशल मीडियावर सक्रिय नाही पण त्याच्या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

गौरी खान आणि भावना पांडे आहेत जवळच्या मैत्रिणी  
अनन्या पांडेची आई भावना पांडे आणि आर्यन खानची आई गौरी खान खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. गौरी खान, संजय कपूरची पत्नी महेश कपूर, भावना पांडे, नीलम कोठारी सोनी आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान हे खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. शाहरुख खान आणि गौरी खान यांनी अलीकडेच या चौघांच्या मैत्रीवर आधारित नेटफ्लिक्स मालिकेत कॅमिओ केला होता.

दोन तास झाली चौकशी
अनन्या पांडे तिचे वडील चंकी पांडेसोबत आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कार्यालयात पोहोचले. NCB अभिनेत्रीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानसोबत एका व्हॉट्सअॅप चॅटमध्ये तिने गांजा पुरवण्याविषयी बातचित केली आहे. अनन्या पांडे म्हणाली की, तिने हे विनोदी पद्धतीने सांगितलं होतं. यापूर्वी गुरुवारी एनसीबीने अनन्या पांडेची दोन तास चौकशी केली. आर्यनची जामीन याचिका विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळली आहे.