...म्हणून भारत - पाकिस्तान पुन्हा मोठ्या पडद्यावर

पाकिस्तान मध्ये उजमाला जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडले होते. 

Updated: Mar 5, 2019, 05:41 PM IST
...म्हणून भारत - पाकिस्तान पुन्हा मोठ्या पडद्यावर title=

मुंबई : भारतीय महिला उजमा अहमदला परत भारतात कशाप्रकारे आणले या गोष्टीचा उलगडा करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. पाकिस्तान मधून उमजाला सुखरूप आपल्या मायदेशी आणणाऱ्या भारतीय राजदूतची कथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. पाकिस्तान मध्ये उजमाला जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडले होते. उजमाला भारतात परत आणण्यासाठी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्ययक्तिकरित्या हस्तक्षेप केले. सुषमा स्वराज यांनी उजमाला भारत कन्या अशी उपमा दिली. 

उजमाचा विवाह पाकिस्तानात राहणाऱ्या ताहिर आली सोबत करण्यात आला होता. ताहिर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत असत. उजमाने त्रासाला कंटाळून एक शक्कल लढवली आणि पाकिस्तनातून आपल्या मायदेशी भारतात परतण्याचा मार्ग शोधून काढला. 
उजमाच्या या धाडसावर सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. 

भारताचे माजी उपायुक्त जे.पी.सिंग यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. त्यांनी उजमाला 25 मे 2017 मध्ये भरतात सुखरूप आणले होते. सिनेमात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची सुद्धा भूमिका असणार आहे. अभिनेत्री तब्बू सुषमा स्वराज यांची भूमिका यांची साकारणार आहे.