Confirm : भारती सिंह Pregnant, लवकरच घरात धावणार चिमुकली पावलं

भारती सिंग लवकरच होणार आई?

Updated: Dec 9, 2021, 12:59 PM IST
Confirm : भारती सिंह Pregnant, लवकरच घरात धावणार  चिमुकली पावलं

मुंबई : टीव्ही जगतातील क्यूट कपल भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया लवकरच गुडन्यूज देणार आहेत. भारतीच्या अगदी जवळच्या व्यक्तीने भारतीची प्रेग्नेंसी कन्फर्म केली आहे. भारतीच्या गरोदरपणाची ही अगदी सुरूवात आहे. 

महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीने गरोदरपणाच्या अगदी सुरूवातीपासूनच कामावर ब्रेक घेतला आहे. आता सध्या तिला आपल्या येणाऱ्या बाळाकडे पूर्ण लक्ष देत आहे. सध्या ती घराबाहेर फार जात नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारती सिंग आपल्या आई होण्याची बातमी टाळतही नाही आणि स्वीकारत देखील नाही. भारती सिंह आपल्या गरोदरपणावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. मात्र भारती आणि हर्ष लांबचिया यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. 

अनेकदा सांगितल होतं सत्य 

विविध कार्यक्रम आणि मुलाखतींमध्ये, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी बाळाबाबत खुलासा केला होता. अनेक दिवसांपासून भारती आणि हर्ष बाळाचं नियोजन करत होते.  त्यांचे चाहते ही आनंदाची बातमी जाहीर करण्याची वाट पाहत होते. तर भारती आणि हर्षच्या हितचिंतकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हे पहिल्यांदाच बाळंतपणासाठी चर्चेत आलेले नाहीत. खरं तर, याआधीही हे दोघे गुडन्यूजकरता चर्चेत आले होते. मात्र यावेळी हे दोघे जे स्टेटस शेअर करत आहेत. त्यामधून अशी हिंट मिळत आहे. 

काही महिन्यांपूर्वी, भारतीने हर्षसोबत एक रोमँटिक टिकटोक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये, दर्शन रावलच्या सिंगल, भुला डुंगा वर गजबजताना लव्हबर्ड्स वेडे-प्रेमात दिसत होते. व्हिडिओसोबत तिने लिहिले होते.