मुंबई : प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याची अधिकृत घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख या शोचे सूत्रसंचलन करणार असल्याची शक्यता आहे. हिंदी बिग बॉस अभिनेता सलमान खान आतापर्यंत होस्ट करत आला आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांचा सलमानसाठी नेहमी आग्रह असतो. सलमान खानमुळे बिग बॉसला देखील चांगंला टीआरपी मिळतो.
१०५ दिवस हा संपूर्ण शो चालला. यामध्ये १९ स्पर्धकांनी भाग घेतला होता. असंख्य टास्क्स पार करत मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने अखेर 'बिग बॉस ११'चे विजेतेपद पटकावले आहे.