नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सत्र न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड सुनावला होता. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सलमानने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार जिल्हा न्यायालयाने त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला. गुरुवारी याप्रकरणी सुनावणी करण्यात आली. परंतु सलमानच्या अनुपस्थितीवर नाराजी दर्शवत न्यायालयाने 'पुढील सुनावणीच्या वेळी सलमान हजर न राहिल्यास त्याचा जामीन रद्द करण्यात येईल' अशा शब्दांत त्याला खडसावले.
गेल्या सुनावणी न्यायालयाने सलमानला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण वारंवार सलमानला ताकीद देऊनही, तो अनुपस्थित राहिला. हे पाहता 'पुढील सुनावणीवेळी सलमान गैरहजर राहिल्यास त्याचा जामीन रद्द करण्यता येईल' असं म्हणत जोधपूर न्यायालयाने त्याला सक्त ताकीद दिली आहे.
Blackbuck poaching case: The Jodhpur court says that if Salman Khan doesn't appear before the court in next hearing, his bail will be rejected. (file pic) #Rajasthan pic.twitter.com/bh3cTpDYF8
— ANI (@ANI) July 4, 2019
५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी सलमानला दोषी ठरवले होते. याप्रकरणी अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री नीलम, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांना निर्दोष मुक्त केले होते.
५ एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सलमानला जोधपूर कारागृहात पाठवण्यात आले होते. मात्र जामीन मिळाल्यानंतर त्याला मध्यवर्ती कारागृहातून जामीन देण्यात आला. त्याला न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.