'बोलो जुबा केसरी'वरुन ट्रोल केल्यानंतर कसं वाटतं? अजय देवगणने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मला...'

Ajay Devgn on Zubaan Kesari Trolling: सोशल मीडियावर सतत ट्रोल केल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगणाचाही (Ajay Devgn) समावेश आहे. त्याच्या 'बोलो जुबा केसरी'वर इतके मिम्स तयार झाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Nov 11, 2024, 07:27 PM IST
'बोलो जुबा केसरी'वरुन ट्रोल केल्यानंतर कसं वाटतं? अजय देवगणने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मला...' title=

Ajay Devgn on Zubaan Kesari Trolling: बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgn) सध्या 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिंघम फ्रॅचाईजीमधील हा तिसरा चित्रपट आहे. पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणे 'सिंघम अगेन' चित्रपटही सुपरहिट झाला आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) चित्रपटाने फक्त 10 दिवसांत 200 कोटींची कमाई केली आहे. अजय देवगणला प्रेक्षकांनी सिंघमच्या भूमिकेसाठी पुन्हा एकदा पसंती दिली आहे. यानिमित्ताने अजय देवगण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

अजय देवगण एक असा अभिनेता आहे जो सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. सोशल मीडियावर सतत त्याला ट्रोल केलं जात असतं. त्याच्या 'बोलो जुबा केसरी'वर इतके मिम्स तयार झाले आहेत. अजय एका इलायची ब्रँडची जाहिरात करतो ज्यांची ही टॅगलाइन आहे. या जाहिरातीत त्याच्यासह शाहरुख खान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दिसतात.

या जाहिरातीमधील अजय देवगण सर्वात जुना स्टार आहे, जो नेहमीच चर्चेत असतो. यामुळेच त्याच्यावर खूप सारे मीम्स तयार होत असतात आणि ट्रोलही केलं जात असतं. दरम्यान या ट्रोलिंगबद्दल नेमकं काय वाटतं हे अजय देवगणने सांगितलं आहे. 

'सिंघम अगेन' चित्रपटात दीपिका-रणवीरचा एकही एकत्र सीन का नाही? रोहित शेट्टीने केला खुलासा, 'आता त्यांच्यात...'

 

रणबीर इलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगणने सांगितलं की, आपल्याला जाहिरातीमुळे होत असलेल्या ट्रोलिंगमुळे फरक पडत नाही. मुलाखतीत रणबीरने अजय देवगणला विचारलं की, "जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारतो. जेव्हा या मीम कल्चरमध्ये कोणी सांगतं की 'जुबा केसरी' तेव्हा तुला काय वाटतं?". यावर अजय देवगणने हसत सांगितलं की, "ठीक आहे, यामुळे मला काही फरत पडत नाही".

यावेळी अजयसोबत बसलेल्या दिग्दर्शक रोहित शेट्टीने आपलं मत मांडत सांगितलं की, "मला वाटतं आता वाईट वाटणं बंद झालं आहे. आजकाल प्रत्येकजण मीमचा आनंद घेतो. आजकाल तर असं झालं आहे की, 'अरे तू तो मीम पाहिला का?'".

सिंघम अगेन, दिवाळीत (1 नोव्हेंबर) प्रदर्शित झाला, चित्रपटातील पात्रांना रामायणातील पात्रांशी जोडण्यात आलं आहे. अजय देवगण आणि करीना कपूर यांना प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांचं प्रतिबिंब दाखवण्यात आलं. अक्षय कुमार जटायूच्या भूमिकेत, रणवीरला भगवान हनुमानाचे प्रतिबिंब आणि अर्जुन कपूर, जो चित्रपटात करीनाचे अपहरण करतो, रावणाच्या रूपात दाखवण्यात आलं. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून चित्रपटात कोणत्याही गाण्याचा समावेश करण्यात आला नाही.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी CBFC च्या आदेशानुसार अनेक दृश्यांमध्ये बदल करण्यात आले होते. चित्रपटातून सुमारे 7.12 मिनिटांचे फुटेज काढून टाकण्यात आले. अहवालानुसार, सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना भगवान रामाच्या चरणांना स्पर्श करताना सिंघमच्या 23-सेकंद लांबीच्या दृश्यात योग्य बदल केले. तसंच रावण सीतेला पकडत आहे, खेचत आहे आणि ढकलत आहे हे 16-सेकंदाचे दृश्य हटवण्यास सांगण्यात आलं. चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरच्या पात्रांभोवती इतर अनेक बदल करण्यात आले होते. सुदैवाने आतापर्यंत चित्रपट कोणत्याही वादात अडकलेला नाही.