close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मिशन मंगल'च्या कमाईची गाडी सुस्साट; गाठला 'हा' टप्पा....

चित्रपटाच्या नावे अनोखा विक्रम 

Updated: Sep 16, 2019, 09:36 AM IST
'मिशन मंगल'च्या कमाईची गाडी सुस्साट; गाठला 'हा' टप्पा....
'मिशन मंगल'च्या कमाईची गाडी सुस्साट; गाठला 'हा' टप्पा....

मुंबई : भारताच्या मंगळयान मोहिमेला केंद्रस्थानी ठेवत एका कथानकाला रुपेरी पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न 'मिशन मंगल' या चित्रपटाच्या निमित्ताने सत्यात उतरला आहे. ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पहिल्या दिवसांपासूनच प्रभावी उंची गाठत असल्याचं पाहायला मिळालं होतं. तोच आता या चित्रपटाने प्रदर्शित झाल्या क्षणापासून तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

जगन शक्ती दिग्दर्शित 'मिशन मंगल'मध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, तापसी पन्नू,  नित्या मेनन, एच.जी. दत्तात्रेय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अतिशय प्रभावी आणि वास्तववादी कथानकाला, किंबहुना देशातील काही सामान्य व्यक्तीमत्वांच्या असामान्य कामगिरीला प्रकाशझोतात आणत 'मिशन मंगल' साकारण्यात आला. 

१५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर तिसऱ्याच दिवशी ५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ज्यानंतर पाचव्या दिवशी हे आकडे १०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचले. पुढे १५० कोटी, १७५ कोटी असे आकडे वाढत वाढत अखेर या चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'मिशन मंगल' या अग्रस्थानी पोहोचला आहे. त्यामुळे खऱ्य्या अर्थाने या चित्रपटाच्या आणि त्यात सहभागी प्रत्येक कलाकाराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.