...बाकी थोडीसी है जिंदगी; विलासरावांच्या आठवणीने रितेश भावूक

व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Updated: May 26, 2020, 01:30 PM IST
...बाकी थोडीसी है जिंदगी; विलासरावांच्या आठवणीने रितेश भावूक  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत एक नाव अग्रस्थानी येतं. ते नाव म्हणजे अभिनेता रितेश देशमुखचं. विविध व्हिडिओ म्हणू नका किंवा फोटो, रितेश कायमच अनोख्या मार्गाने त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणतो. पण, आज मात्र हाच रितेश अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. 

निमित्त ठरत आहे, ते म्हणजे त्याने पोस्ट केलेला एक व्हिडिओ. वडिलांच्या स्मरणार्थ रितेशने एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो प्रचंड भावूक झाल्याचं दिसत आहे. 'अभी मुझमे कही बाकी थोडी सी है जिंदगी...' या गाण्यावर रितेश व्यक्त होत असून, आपले वडील सोबतच असल्याची सुरेख भावना व्यक्त करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये विलासराव देशमुख यांच्यासोबतचा त्याचा एक फोटोसुद्धा दिसत आहे. ज्या माध्यमातून त्याने वडिलांना त्यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समृतीस अभिवादन केलं आहे. 

लालू प्रसाद यादवांचा रेल्वे मंत्रालयाला टोला, म्हणे जरा जास्तच.... 

रितेश आणि विलासराव देशमुख यांचं नातं हे शब्दांत व्यक्त करण्यापलीकडलं हे सारे जाणतात. हा व्हिडिओ त्याचाच प्रत्यय देत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळ गाजवणारे आणि जनतेच्या मनातील राजकीय नेता म्हणून ओळख असणाऱ्या विलासराव देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अनेकांनीच त्यांच्या समृतींना अभिवादन केलं.