close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'तिच्या'सोबत सलमान खान पोहोचला वाघा बॉर्डरवर

ती आहे तरी कोण? 

Updated: Nov 15, 2018, 02:29 PM IST
'तिच्या'सोबत सलमान खान पोहोचला वाघा बॉर्डरवर

मुंबई : भारत - पाकिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये असणारी वाघा बॉर्डर ही सीमा अनेकांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. कलाविश्वातही या ठिकाणाला अनेकांकजडूनच महत्वं दिलं गेल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडत आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे 'भारत'.

सोशल मीडियावर अभिनेता सलमान खान याने नुकताच त्याच्या अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो वाघा बॉर्डरपाशी पाठमोरा उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबत एक महिलाही पाठमोरी दिसत असून ती, आहे तरी कोण असाच प्रश्न पडतोय. 

'तिच्या' शोधात तुम्हाला पर्याय सुचण्यास सुरुवात होण्यापूर्वी खुद्द सलमाननेच ही बाब स्पष्ट केली आहे. 

'भारत' या आगामी चित्रपटात तो कतरिना कैफ हिच्यासोबत स्क्रीन शेअर करत असून, या जोडीची एक झलकच चित्रपटाच्या निमित्ताने पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. 

२०१९ मध्ये सलमानचा हा चित्रपट प्रेक्षकांत्या भेटीला येणार असून, त्यात कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर हे कलाकारही झळकणार आहेत.