अखेर बहिणीच्याच वाटेवर चालली करीना...

अनेक वर्षांनंतर ती या निर्यणावर पोहोचली आहे. 

Updated: Mar 6, 2020, 03:01 PM IST
अखेर बहिणीच्याच वाटेवर चालली करीना...
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही गाजलेल्या आणि नावाजलेल्या कुटुंबांपैकी एक म्हणजे कपूर कुटुंब. सुरुवातीपासूनच या कुटुंबातील व्यक्तींनी कलेच्या या विश्वामध्ये आपलं बहुमुल्य योदगान दिलं. पृथ्वीरात कपूर यांच्यापासून ते अगदी करीना कपूर आणि रणबीरपर्यंतची पिढीसुद्धा या कलाविश्वात स्थिरावली आहे. याच नव्या पिढीतील अभिनेत्री करीना कपूर Kareena Kapoor हिने अखेर तिच्या बहिणीच्या म्हणजे करिष्मा कपूर हिच्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला आहे. 

करिष्माच्या वाटेवर म्हणजे, करीना चित्रपट विश्वाला रामराम ठोकण्याच्या वगैरे विचारात कर नाही ना? असा प्रश्न तुमच्या मनात घर करत असल्यात विचारांचं हे चक्र इथेच थांबलं तर उत्तम. कारण, करीनाने तिच्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत सोशल मीडियाच्या वर्तुळात आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याप्रमाणे करिष्मा चित्रपटांमध्ये सक्रिय नसतानाही चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास नातं जपत आहे, त्याचप्रमाणे हे खास नातं अनुभवण्यासाठी करीनाही या वर्तुळात आली आहे.

करीना सहसा सोशल मीडियावर कमीच दिसते. असं असलं तरीही तिचे अनेक फॅन पेज मात्र तितकेच चर्चेत असतात. अशा या सर्व वातावरणात आता खुद्द बेबोचीच एंट्री झाल्यामुळे, 'वो कौन है जिसने पू को मुडके नही देखा', किंवा 'मै अपनी फेवरिट हूँ' असं म्हणणाऱ्या करीनाचा नवा अंदाज पाहता येणार यात वाद नाही. 

 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ

करीनाने इन्स्टाग्रामवर पदार्पण करत तिने काही पोस्टही शेअर केल्या आहेत. ज्याला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टमध्ये ती काळ्या आणि सोनेरी रंगाच्या हूडीमध्ये दिसत आहे. The cat's out of the bag, असं कॅप्शन लिहित करीनाने #HelloInstagram असा हॅशटॅगही या पोस्टमध्ये लिहिला आहे. तिचं हे कॅप्शन, पहिला फोटो आणि सोबतचा हॅशटॅग म्हणजे एका नव्या पर्वाची सुरुवात. तेव्हा आता या 'इन्स्टा' माहोलात ती नेमकी कशी रुळते हे पाहणं औत्सुक्याचं असेल.