अमिताभ- रेखा यांना त्या अवस्थेत पाहून काय होती जया बच्चन यांची प्रतिक्रिया?

यांच्यामधील जवळीक सर्वांचं लक्ष वेधून गेली होती. 

Updated: Nov 8, 2021, 02:11 PM IST
अमिताभ- रेखा यांना त्या अवस्थेत पाहून काय होती जया बच्चन यांची प्रतिक्रिया?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : चिरतरुण उदाहरण म्हणून अभिनेत्री रेखा यांच्याकडे पाहिलं जातं. ज्येष्ठ अभिनेत्रींच्या यादीत जरी त्यांच्या नावाचा समावेश होत असला तरीही त्यांच्या सौंदर्यामध्ये मात्र वाढत्या वयाचे संकेत पाहायला मिळत नाहीयेत. 'सावन भादों' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. ज्यानंतर त्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून झळकल्या. 

रेखा यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे, 'मुकद्दर का सिकंदर'. या चित्रपटामध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये एका अशा दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं जिथे बिग बी आणि रेखा यांच्यामधील जवळीक सर्वांचं लक्ष वेधून गेली होती. 

जया बच्चन यांना हे सारं पहावलं नाही, त्यांच्या डोळ्यात हे पाहून अश्रूच उभे राहिले होते. या साऱ्याचा खुलासा खुद्द रेखा यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. 

तेव्हा नेमकं काय झालेलं... 
त्या क्षणाविषयी सांगताना रेखा म्हणाल्या होत्या, 'जया बच्चन यांचं कुटुंब मुकद्दर का सिकंदरच्या ट्रायल शोसाठी आलं होतं. तेव्हा मी संपूर्ण कुटुंबाला प्रोजेक्शन रुमच्या सहाय्यानं पाहत होते. जया बच्चन या पहिल्याच रांगेत होत्या आणि त्यांचं कुटुंब दुसऱ्या रांगेत. 

रेखा यांनी सांगितल्यानुसार बिग बींसोबतच्या त्यांच्या या दृस्यानंतर जया यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. या ट्रायल शोनंतर एकाच आठवड्याने आपण रेखा यांच्यासोबत पुन्हा काम करणार नाही, असं अमिताभ बच्चन यांनी निर्मात्यांना सांगितलं होतं. 

रेखा यांच्या कानावर या गोष्टी बाहेरुनच आल्या होत्या. खुद्द बिग बी त्यांना असं काहीच म्हणाले नव्हते. या मुद्द्यावर चर्चा सुरु केल्यास आपल्याला काहीही बोलायचं नसल्याचंच ते सांगत होते.