T20 World Cup: टीम इंडियाच्या जर्सीवर लागला दुसरा स्टार; पाहा का आणि कसा होतो हा बदल

T20 World Cup 2024 Final: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉरमॅटची जर्सी वेगळी असते. या जर्सीवर लावलेल्या स्टार्सची संख्या त्या फॉरमॅटशी संबंधित टीम्सने जिंकलेल्या ट्रॉफीच्या संख्येइतकी आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 1, 2024, 05:41 PM IST
T20 World Cup: टीम इंडियाच्या जर्सीवर लागला दुसरा स्टार; पाहा का आणि कसा होतो हा बदल title=

T20 World Cup 2024 Final: टीम इंडियाने दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा खिताब जिंकला आहे. शनिवारी रात्री बार्बाडोसमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यावेळी 7 रन्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने करोडो भारतीयाची मनं जिंकली. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली. दरम्यान या विजयानंतर टीम इंडियाच्या जर्सीवर दुसरा स्टार लावण्यात आला आहे. याआधी टीम इंडियाच्या जर्सीवर एकच स्टार होता. हा प्रश्न चाहत्यांच्या मनात नक्कीच असेल की टीम इंडियाच्या जर्सीवर दुसरा स्टार कसा लावण्यात आला. 

टीम इंडियाच्या जर्सीवर किती स्टार्स?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉरमॅटची जर्सी वेगळी असते. या जर्सीवर लावलेल्या स्टार्सची संख्या त्या फॉरमॅटशी संबंधित टीम्सने जिंकलेल्या ट्रॉफीच्या संख्येइतकी आहे. टीम इंडियाच्या जर्सीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा म्हणजेच बीसीसीआयचा लोगो आहे. आता या लोगोच्या अगदी वरच्या बाजूला स्टार लावण्याच आले आहेत. भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे. याआधी टीम इंडियाने 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली होती.

भारताने आतापर्यंत दोन वेळा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे. याशिवाय इंग्लंड क्रिकेट टीमनेही ही स्पर्धा दोनदा जिंकली आहे. त्याच्या जर्सीवरही दोन स्टार आहेत. इंग्लंडने 2010 आणि 2022 मध्ये विजय मिळवला होता. वेस्ट इंडिजनेही दोनदा विजेतेपद पटकावलं आहे. 2012 आणि 2016 मध्ये त्याने विजेतेपद पटकावलं होतं. श्रीलंका आणि पाकिस्तानने प्रत्येकी एकदा फायनल जिंकली आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत अजिंक्य

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने एकही सामना गमावला नाही. त्यांनी सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडचा 68 रन्सने पराभव केला होता. यानंतर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यापूर्वी सुपर 8 च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 24 रन्सने पराभव केला होता. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने एकही सामन्यात पराभव पत्करला आहे. 

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 7 रन्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून चाहत्यांवर आनंदाचा वर्षाव केला. या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 177 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची टीम केवळ 169 रन्स करू शकली. या विजयाने भारताचा वर्ल्डकपमधील दुष्काळ तब्बल 13 वर्षांनंतर संपला.