SSR Case : सुशांतच्या मृतहेदाजवळ रिया गेली खरी, पण....

मोठी माहिती उघड   

Updated: Aug 31, 2020, 05:35 PM IST
SSR Case : सुशांतच्या मृतहेदाजवळ रिया गेली खरी, पण....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर बरेच दिवस उलटून गेले. असं असलं तरीही त्याच्या आत्महत्येभोवती असणारं संशयाचं वलय सातत्यानं काही प्रश्न समोर आणत आहे. यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही चांगलीच अडचणीत आल्याचं चित्र आहे. यातच भर टाकणारी आणखी माहितीसुद्धा समोर आली आहे. ही माहिती त्या क्षणाची आहे, जेव्हा रिया सुशांतच्या मृतदेहापाशी थेट रुग्णालयात पोहोचली होती. 

कूपर रुग्णालयात जेव्हा सुशांतचा मृतदेह नेण्यात आला तेव्हा त्याला शेवटचं पाहण्यासाठी म्हणून रिया तेथे पोहोचली होती. पण, त्यावेळी तिनं कोणाचीही परवानगी घेतलेली नव्हती अशी माहिती आता वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केली आहे. 

महाराष्ट्र मानवाधिकार आयोगानं याबाबत कूपर रुग्णालयाला नोटीसही पाठवली होती. ज्याबाबत उत्तर देत आपण रियाला कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी दिली नसल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर यांनी आयोगाला उत्तर देत स्पष्ट देत रिया सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी कशी पोहोचली याची माहिती नसल्याचं सांगितलं. रुग्णालयाकडून तिला अधिकृत परवानगी देण्यात आली नव्हती हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. 

डॉ. गुज्जर यांनी दिलेला हा तोंडी जबाब सदर प्रकरणातील एक महत्त्वाची माहिती ठरत आहे. सध्या आय़ोगानं त्यांना हा जबाब लिखित स्वरुपात नोंदवण्यास सांगितल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय ७ सप्टेंबरला त्यांना आयोगापुढं पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 

 

सुशांतनं मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या त्याच्या निवासस्थानी आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. तेथे रियाही पोहोचली होती. सुशांतच्या अंत्यसंस्कारामध्ये त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार आपल्याला सहभागी होऊ देणार नसल्याची विनंती करत ती मृतदेहापाशी गेली होती असं म्हटलं जात आहे.