Pornography Case | पतीला जामीन मंजूर होताच शिल्पा शेट्टीची लक्षवेधी पोस्ट

पतीला मिळालेला जामीन आणि शिल्पाची  पोस्ट याचा संबंध जोडत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा या जोडीच्या नात्याच्या भविष्याबाबत चिंता व्य़क्त केली.   

Updated: Sep 21, 2021, 07:57 AM IST
Pornography Case | पतीला जामीन मंजूर होताच शिल्पा शेट्टीची लक्षवेधी पोस्ट
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : अश्लील व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, राज कुंद्रा याला जामीन मंजूर करण्यात आला. त्याला जामीन मंजूर होताच शिल्पानं पहिली प्रतिक्रिया दिली. ज्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष याकडे वेधलं गेलं. पतीला मिळालेला जामीन आणि शिल्पाची  पोस्ट याचा संबंध जोडत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा या जोडीच्या नात्याच्या भविष्याबाबत चिंता व्य़क्त केली. (Bollywood actress shilpa-shetty-shares-post-after-bail-to-husband-raj-kundra)

'मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात', असं लिहित शिल्पानं एक फोटो तिच्य़ा इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला. मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारी राज कुंद्रा याला जामीन मंजूर करण्यात आला. अश्लील व्हिडीओ प्रकरणी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. 19 जुलै रोजी कुंद्राला रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, कुंद्रासोबतच त्याचा साथीदार रायन थोरपे यालाही जामीन मिळाला आहे. 

सदर प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलनं 1500 पानांची सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या चार्जशीटमध्ये 43 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. 

नात्यात वादळ? 
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या नात्यामध्ये पोर्नोग्राफी प्रकरणामुळं वादळ आलं असून येत्या काळात त्यांचा घटस्फोट होण्याच्य़ा चर्चेनंही जोर धरला होता. राज कुंद्राच्या या प्रकरणाची, त्याच्या या कामाची आपल्याला काहीच माहिती नव्हती. कारण मी माझ्या कामांमध्ये व्यग्र होते अशी माहिती शिप्लानं दिली होती. शिल्पाची ही वक्तव्य आणि तिच्या पोस्ट बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेली होती.