लग्नाआधीच पायात जोडवी.. अभिनेत्रीनं सांगितलं असं करण्यामागचं खरं कारण

गोव्याहून परतल्यानंतर ...

Updated: Jan 6, 2022, 05:25 PM IST
लग्नाआधीच पायात जोडवी.. अभिनेत्रीनं सांगितलं असं करण्यामागचं खरं कारण  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपट वर्तुळामध्ये काही अशा गोष्टी घडत आहेत जे पाहता, खरंच नव्याची नवलाई सुरु झाल्याचं म्हणावं लागत आहे. बऱ्याच सेलिब्रिटींनी यंदा त्यांच्या परिनं विविध 
ठिकाणांहून नव्या वर्षाचं स्वागत केलं. अशाच एका अभिनेत्रीनं गोव्याहून परतल्यानंतर सर्वांनाच थक्क केलं. 

पाण्यात भिजलेले पाय, त्यावर दिसणारी चमक आणि पायात असणारी जोडवी.... असा एक फोटो तिनं पोस्ट केला. 

समुद्रकिनारी निवांत क्षण व्यतीत करताना का बरं या अभिनेत्रीला जोडवीं फ्लाँट करण्याची इच्छा झाली असावी? अनेकांनीच प्रश्न केला. 

फोटो पोस्ट करणारी ही अभिनेत्री म्हणजे तनिषा मुखर्जी. 

अभिनेत्री काजोलची बहीण आणि अजय देवगनची मेहुणी तनिषा हिनं हा फोटो पोस्ट करताच तिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला. 

सहसा लग्न झाल्यानंतर जोडवी घालतात अशीच एक धारणा. ज्यामुळं तनिषाच्या पायातील हा अलंकार भलतंच लक्ष वेधलं. 

तनिषानंच शेवटी मग तिच्या लग्नावरून प्रश्न उपस्थित केले जात असताना काही गोष्टी स्पष्ट केल्या. 

'आतापर्यंत मी सिंगलच आहे, सध्यातरी मला कोणीही मिस्टर परफेक्ट सापडलेला नाही. जोडवी घालायला आवडतात म्हणून मी त्यांचा फोटो पोस्ट केला इतकंच', असं तनिषा म्हणाली. 

आपल्याला खरंच आपल्या फॅशन सेन्सबद्दल इतरांना सांगण्याची गरज आहे का, असा उपरोधिक प्रश्न तिनं केला. 

जेव्हा मी लग्न करेन तेव्हा सर्वांनाच सांगेन. पण, सध्यातरी मला कोणीही ड्रीम मॅन सापडलेला नाही, आणि तो सापडत नाही तोवर  ड्रीम वेडिंग होणार नाही, असंही तनिषानं सांगितलं.