कोरोनानंतर अशी झाली कतरिना कैफची अवस्था, फोटोद्वारे मॅसेज शेअर

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकेक करून अनेक तारे या विषाणूच्या आड येऊ लागले आहेत. नुकतीच अभिनेत्री कतरिना कैफचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिने एक फोटो पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे.

Updated: Apr 11, 2021, 10:22 PM IST
कोरोनानंतर अशी झाली कतरिना कैफची अवस्था, फोटोद्वारे मॅसेज शेअर

मुंबई : सध्या कोरोना विषाणू वेगाने पाय पसरत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकेक करून अनेक तारे या विषाणूच्या आड येऊ लागले आहेत. नुकतीच अभिनेत्री कतरिना कैफचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिने एक फोटो पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे.

कतरिनाचा फोटो

नुकतीच अभिनेत्री कतरिना कैफला देखील कोरोना झाला आहे आणि तिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली. सध्या ती घरी आयसोलेट राहून स्वत: ची काळजी घेत आहे. दरम्यान, कतरिनाने एक  सेल्फी अपलोड केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. त्या बरोबर तिने एक संदेशही दिला आहे.

कतरिना कैफ ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. वेळ आणि संयम - असे तिने त्यांना कॅप्शन देखील लिहिले आहे. याचा अर्थ  स्पष्ट आहे की, ती म्हणत आहे या साथीच्या रोगाला लढा देण्यासाठी आपल्याला वेळ आणि धैर्याची आवश्यकता आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिनाचे चित्रपट

कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिच्या आगामी ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण कतरिनाने तिचे शूटिंग आधीच केले होते आणि उर्वरित शूट एप्रिलच्या शेवटी आहे. सध्या सलमान खान त्याचे  शूटिंग पूर्ण करत आहे.

यामुळेच 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगवर याचा काहीही परिणाम होणार नाही. 'सूर्यवंशी' चित्रपटाची रिलीज डेट कोरोनामुळे वाढविण्यात आली आहे. या चित्रपटात कटरिना शिवाय अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे.