जान्हवी पाठोपाठ खुशी देखील करणार सिनेमा

काय म्हणाले बोनी कपूर? 

जान्हवी पाठोपाठ खुशी देखील करणार सिनेमा

मुंबई : बोनी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवीच्या मोठ्या मुलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. धडक या सिनेमांतून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. जिथे तिच्या अपोझिट शाहीद कपूरचा भाऊ अभिनेता ईशान खत्तर आहे. आता अशी माहिती मिळते की जान्हवीची छोटी बहिण म्हणजे श्रीदेवीची दुसरी मुलगी खुशी देखील प्रेरित होऊन आता अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. 

जान्हवीचा अभिनय काही लोकांना पसंद आला तर काहींनी तिच्या अभिनयावर बोट ठेवलं. एवढंच काय तर काहींनी जान्हवीची तुलना श्रीदेवीसोबत करत अभिनय चांगला नसल्याच देखील सांगितलं. बोनी कपूर यांनी सांगितले की, त्यांनी कधीच दोन्ही मुलींना सिनेमासाठी प्रोत्साहन दिलं नाही तर कधी नाकारलं देखील नाही. कारण त्यांच्यातील कलागुणांना कायम वाव दिला. त्यांच असं म्हणणं आहे की, त्यांच्यातील नॅचरल गुणांना कधीच दाबलं नाही पाहिजे. 

खुशी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

त्याने हे देखील सांगितलं की, मला अर्जून कपूर हा उत्तम अभिनेता आहे यावर विश्वासच नव्गता. जोपर्यंत अभिनेता सलमान खानने अर्जुन कपूरची स्तुती केली नव्हती. पुढे अंशुला बद्दल बोनी कपूर सांगतात की, ती सुरूवातीपासून अभ्यासात हुशार होती. खुशी बाबत बोनी कपूरने सांगितलं की, तिला सुरूवातीपासूनच मॉडेल होण्याची इच्छा होती. मात्र आता तिला अभिनेत्री होण्याची इच्छा आहे.