मुंबई : टेलिव्हीजन जगतातील लोकप्रिय जोडी जूही परमार आणि सचिन श्रॉफ यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. लग्नाच्या ८ वर्षानंतर हे जोडपे एकमेकांपासून वेगळे झाले. घटस्फोटानंतर सचिनने सांगितले की, मला आता कळलंय की, नात्यात दोन्हीकडून प्रेम असणे, खूप गरजेचे आहे. सचिनच्या या वक्तव्यामुळे घटस्फोटासाठी फक्त जूहीला जबाबदार धरल्याचे तिला वाटत आहे.
सचिनच्या या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी जूहीने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट लिहिली. त्यात ती म्हणते की, लोकांनी काहीही विचार केला आणि काहीही बोलले. त्यावर मी गप्प का आहे, असे मला अनेकदा विचारण्यात आले. २७ जानेवारी २०१३ मध्ये एका आईचा जन्म झाला. माझी मुलगी माझी प्राथमिकता बनली. एकमेकांवर आरोप करायचे नाहीत, असे आम्ही ठरवले होते. हे आपल्या मुलीसाठी योग्य असेल. मी नेहमीच हे म्हणत आले आहे की, वैवाहिक जीवन अपयशी होण्यास आपण दोघेही जबाबदार आहोत.
मी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की, माझे बोलणे असे मोडून तोडून सादर केले जाईल. लग्न तुटल्याचा सगळा आरोप माझ्यावर लावण्यात आला. तु म्हणाला होतास की, या नात्यात काही प्रेम नव्हते. फक्त तु्झ्याकडूनच प्रेम होते. बस प्रेम फक्त तूच करत होतास मी नाही.
इतकंच नाही तर जूहीने आपला डीपी देखील बदलला. त्यात एक संदेश आहे. त्यात लिहिले आहे की, नाते तुटते तेव्हा दुःख होते. पण जर कोणी तुमचा आदर करत नसेल तर याचा अर्थ तुम्ही काही गमावले नाही तर काही कमावले आहे.
१५ फेब्रुवारी २००९ मध्ये जूही आणि सचिन विवाहबद्ध झाले. दोघांनाही ४ वर्षांची मुलगी आहे. मुलगी जूहीसोबतच राहणार असली तरी सचिन तिला भेटू शकेल. जूही आणि सचिन गेल्या १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. घटस्फोटानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची सचिन-जूहीला मोठी मदत