Cardi B On Her Buttocks Fillers : कार्डी बी (Cardi B) ही लोकप्रिय अमेरिकन रॅपर आहे. कार्डी हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच कार्डी बीनं तिच्या कॉस्मेटिक सर्जरीविषयी मोकळेपणानं सांगितले आहे. जे ऐकल्यानंतर कार्डी बी च्या चाहत्यांना धक्काबसला आहे. कार्डी बीनं हे मान्य केलं की तिनं तिच्या नाकाची सर्जरी केली. त्यासोबत तिनं तिच्या बट शॉटपासून सुटका मिळवण्यासाठी तर एक सर्जरी केली. तिनं तिच्या ज्या चाहत्यांना सर्जरी करायची इच्छा आहे त्यांना काही सुचना दिल्या आहेत.
कार्डी बीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाइव्ह दरम्यान, कार्डी बीनं खुलासा केला की 'या वर्षी ऑगस्टमध्ये तिची सर्जरी राहिली होती. तिनं सांगितलं की ही कॉस्मेटिक सर्जरी नव्हती, पण तिनं तिच्या बट शॉट्सचे जवळपास 95 टक्के काढून टाकले आहे. कार्डी बीनं 95% बायोपॉलिमर्स काढून टाकले आहे. बायोपॉलिमर्स म्हणजेच बट शॉट्स. तर कृपया असं करू नका.'
बट लिफ्टबद्दल बोलताना कार्डी बी पुढे म्हणाली, जेव्हा BBLs (ब्राझलियन बम लिफ्ट) चा प्रश्न येतो आणि त्यावर तुम्हाला माझ्याकडून सल्ला हवा असेल, तर BBL पूर्ण करण्यापूर्वी तुम्हाला रक्ताची पातळी ठीक असल्याची खात्री करावी लागेल. जर डॉक्टर म्हणाले की तुमची रक्ताची पातळी खूप कमी आहे किंवा तुम्हाला मधुमेह किंवा काही आहे, तर चुकूनही सर्जरी करू नका.'