सेलिब्रिटींच्या घराचे वीज बील पाहून तुम्हीही व्हाल अचंबित !

 उगाच लाईट, फॅन चालू ठेवला म्हणून तुम्ही नक्कीच कधीतरी घरातल्यांचा ओरडा खाल्ला असेल. किंवा विनाकारण लाईट, फॅन चालू राहिलेली बघून तुमची देखील चिडचिड होत असेल. विजेच्या बिलाचा आकडा काही ठराविक रकमेच्या पुढे गेला की आपल्या सर्वसामान्यांना धक्का बसतो. ही झाली आपली मध्यमवर्गीय घरातील गोष्ट. पण कधी विचार केलाय सेलिब्रिटींच्या घराचे विजेचे बिल किती येत असेल ?

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 31, 2017, 04:25 PM IST
सेलिब्रिटींच्या घराचे वीज बील पाहून तुम्हीही व्हाल अचंबित ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : उगाच लाईट, फॅन चालू ठेवला म्हणून तुम्ही नक्कीच कधीतरी घरातल्यांचा ओरडा खाल्ला असेल. किंवा विनाकारण लाईट, फॅन चालू राहिलेली बघून तुमची देखील चिडचिड होत असेल. विजेच्या बिलाचा आकडा काही ठराविक रकमेच्या पुढे गेला की आपल्या सर्वसामान्यांना धक्का बसतो. ही झाली आपली मध्यमवर्गीय घरातील गोष्ट. पण कधी विचार केलाय सेलिब्रिटींच्या घराचे विजेचे बिल किती येत असेल ?

सेलिब्रिटींची घरं मोठी असतात. मग अर्थातच घरात विजेचा वापर देखील तितकाच अधिक होत असणार. ‘इंडिया टाइम्स’, ‘अमर उजाला’ यांसारख्या अन्य काही वेबसाइट्सनी अंदाजे किती इलेक्ट्रिसिटी बिल येत असेल, याची माहिती दिली. 

वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान दर महिन्याला जवळपास ४३ लाख रुपये वीज बिलावर खर्च करतो. हा आकडा केवळ त्याच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्याच्या बिलाचा आहे. तर सलमान खान वांद्रे येथील अपार्टमेण्ट आणि ‘बिइंग ह्युमन’च्या मुख्य कार्यालासाठी वीज बिलावर जवळपास २९ लाख रुपये खर्च करतो. आमिर खानच्या अपार्टमेण्टचे अंदाजे महिन्याला नऊ लाख रुपये तर ‘आमिर खान फिल्म्स’च्या ऑफिसचे १३ लाख रुपये वीज बिल येते.

जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचे वीज बिल अंदाजे २२ लाख रुपये इतके येते. सैफ अली खान मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांतील बंगल्याकरिता अंदाजे ३० लाख रुपये बिल भरतो.

दीपिका पदुकोण महिन्याला १३ लाख रुपये वीज बिलावर खर्च करते. कतरिना कैफ तिच्या केवळ मुंबईतील अपार्टमेण्टच्या वीज बिल १० लाख इतके येते.