अभिनेत्रीला कोरोनाची लक्षणं, रुग्णालयांचं मात्र दुर्लक्ष

दिल्ली सरकारकडे केली चाचणीची विनंती  

Updated: Jun 13, 2020, 02:01 PM IST
अभिनेत्रीला कोरोनाची लक्षणं, रुग्णालयांचं मात्र दुर्लक्ष  title=

मुंबई : ऐकीकडे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना  दिसत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयांमधील व्यवस्था अपूरी पडत असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे. दरम्यान ‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्री चार्वी सराफला गेल्या आठवड्यापासून कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत. मात्र अद्यापही तिची कोरोना चाचणी करण्यात आली नाही. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून चार्वीने पिंकविला वेबसाइटला पत्र लिहित दिल्ली सरकारकडे मदतीची विनंती केली आहे. 

गेल्या आठवड्यापासून चार्वीला ताप, अंगदुखी, घसादुखी, डोकेदुखी आणि श्वसनाचा त्रास जाणवत आहे. ती म्हणाली 'कोरोना व्हायरसची समस्या जाणवू लागल्यामुळे मी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी  मी अनेक डॉक्टरांना फोन देखील केले, परंतु त्यांनी आमच्याकडे कोरोना चाचणीसाठी किट्स नसल्याचे सांगितले.' अशा प्रकारे सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी तिला चाचणी करण्यास नकार दिला 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Life doesn’t get easier or more forgiving, we get stronger and more resilient!! #letskeepitgoing

A post shared by Charvi Saraf (@sarafcharvi) on

अखेर तिने दिल्ली सरकारकडे कोरोना चाचणीसाठी  मागणी केली आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर नाही त्यामुळे मला रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी जाणं शक्य नाही. त्यामुळे माझ्या घरी कोणीतरी यावं आणि माझी कोरोना चाचणी करावी अशी मागणी तिने दिल्ली सरकारकडे केली आहे. 

चार्वी सराफ ‘कसौटी जिंदगी की’या मालिकेत प्रेरणाच्या बहिणीची व्यक्तीरेखा साकारली होती.  २००३ मध्ये लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेचा हा नवीन सिझन होता.