आमिरच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्येच 'लेकीं'च्या कृतीनं वेधलं लक्ष

तिथं आमिर- किरणच्या नावाची चर्चा थांबत नाहीत, तोच.... 

Updated: Jul 3, 2021, 03:28 PM IST
आमिरच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्येच 'लेकीं'च्या कृतीनं वेधलं लक्ष  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेता ( Aamir Khan Kiran Rao ) आमिर खान आणि किरण राव या सेलिब्रिटी जोडीनं त्यांचा 15 वर्षांच्या वैवाहिक नात्याचा प्रवास संपवला. त्यांच्या या निर्णयानं सर्वांनाच धक्का दिला. बॉलिवूड वर्तुळापासून चाहत्यांमध्येही अनेकांनाच यावर विश्वासही बसेना. अखेर आमिर आणि किरणच्याच एका पत्रकातून हे चित्र अधिक स्पष्ट केलं. 

तिथं घटस्फोटाच्या या चर्चा थांबत नाहीत, तोच आमिरच्या ऑनस्क्रीन मुली, म्हणजेच 'दंगल' या चित्रपटात त्याच्या मुलींच्या भूमिकेत दिसलेल्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या कृतीनं सोशल मीडिया गाजवलं. 

Aamir Khan-Kiran Rao Divorce : 15 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर आमिर खान- किरण रावच्या नात्याला तडा 

ऑनस्क्रीन बहिणींच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्रींची ही जोडी, खऱ्या आयुष्यातही तितकंच चांगलं नातं जोपासते. मैत्रीचे हेच बंध अधिक दृढ करत आता या दोघींनीही एकसारखाच टॅट्टू काढून घेतला आहे. फातिमानं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्या या टॅट्टूचे फोटो पोस्ट केले. 

Aamir- Kiran Divorce : हम 'थे' राही प्यार के

सान्या आणि फातिमानं, त्यांच्या हातावर टिंब असणारा टॅट्टू काढला आहे.  सान्या आणि फातिमाचा हा टॅट्टूला अनेकांनी पसंतीही दिली आहे. आमिर खानसोबत 'दंगल' चित्रपटातून झळकलेल्या या दोघींनाही त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटाच्या निमित्तानं सुरु झालेल्या या दोघींचीही मैत्री सेलिब्रिटी वर्तुळात चांगलीच प्रकाशझोतात असते.