जेव्हा दीपिका म्हणाली, 'मला रणबीरला कंडोम गिफ्ट द्यायचं आहे....'

रणबीर आणि दीपिका यांच्या नात्यातील मोठं सत्य... ज्यामुळे ऋषी कपूर नाराज  

Updated: Apr 8, 2022, 05:54 PM IST
जेव्हा दीपिका म्हणाली, 'मला रणबीरला कंडोम गिफ्ट द्यायचं आहे....'  title=

मुंबई  : सध्या इंडस्ट्रीमध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट्च्या लग्नाबद्दल तुफान चर्चा रंगत. लग्नाच्या चर्चा रंगत असताना दोघांच्या भुतकाळातील अनेक किस्से देखील पुन्हा समोर येत आहेत.  एक काळ असा होता, जेव्हा रणबीर आणि अभिनेत्री दीपिका पादुकेणच्या नात्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस पडली. पण रणबीर आणि दीपिकाचं नातं फार काळ टिकलं नाही. 

ब्रेकअपनंतर दीपिका आणि अभिनेत्री सोनम कपूर दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये आल्या. तेव्हा दोघांनी रणबीर कपूरबद्दल वक्तव्य केले. ज्यावर ऋषी कपूर यांनी दोघींवर नाराजी व्यक्त कर त्यांना सल्ला देखील दिला. 

कॉफी विथ करणच्या रॅपिड फायर दरम्यान, जेव्हा दीपिकाला विचारलं गेलं की, ती रणबीर कपूरला काय गिफ्ट देऊ इच्छिते तेव्हा तिने 'कंडोमचे पॅकेट' असं उत्तर दिलं. दीपिकाच्या उत्तरावर ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली. 

ऋषी कपूर, सोनम आणि दीपिकाला म्हणाले, 'दोघींनी असं काही बोलण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रीत करायला हवा... त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे त्यांच्या क्लास समजतो....' दोघींना असं बोलून ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली.