'धडक'च्या चित्रिकरणाला सुरुवात...

मराठीत सैराट जबरदस्त गाजल्यानंतर इतर भाषेत चित्रपटाचे रिमेक सुरू झाले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 1, 2017, 10:32 AM IST
'धडक'च्या चित्रिकरणाला सुरुवात... title=

मुंबई : मराठीत सैराट जबरदस्त गाजल्यानंतर इतर भाषेत चित्रपटाचे रिमेक सुरू झाले. हा चित्रपट हिंदीत होत असून धडक असे त्याचे नाव असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरूवात झाली. राजस्थानमधील उदयपुरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग होत आहे.

मुख्य भुमिकेत

या चित्रपटात अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता शाहीद कपूरचा मुलगा ईशान खट्टर मुख्य भुमिकेत आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहेत. 

चित्रपटाचा मुहूर्त

चित्रपटाच्या मुहूर्तावर पुजा करून शूटिंगला सुरूवात करण्यात आली. काही दिवसांपुर्वी चित्रपटाचा फर्स्ट लुक जाहीर करण्यात आला होता. त्यात ईशान आणि जान्हवीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती चांगलीच मिळाली. 
जान्हवी खूप दिवसांपासून चर्चेत आहे आणि आता चित्रपटात आपला जलवा दाखवण्यासाठी ती तयार आहे.

फोटो शेअर केला

उदयपूरमध्ये सुरू झालेल्या शूटिंग लोकेशनचा एक फोटो दिग्दर्शन शशांक खेतान यांनी शेअर केला. चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत होत आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट भलताच चर्चेत होता. हा चित्रपट पुढच्या वर्षी ६ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

 

 

#sunset ... the golden ball that lights up our lives ...

A post shared by Shashank Khaitan (@shashankkhaitan) on