'धडक' च्या सेटवर जान्हवीला दिसली श्रीदेवी

काय म्हणतेय जान्हवी

'धडक' च्या सेटवर जान्हवीला दिसली श्रीदेवी title=

मुंबई : जान्हवी कपूर आपला पहिला सिनेमा 'धडक' मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. या सिनेमांत तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर देखील आहे. या वर्षाच्या सुरूवातीला जान्हवीच्या या सिनेमाच शुटिंग सुरू झालं होतं. मात्र तेव्हाच जान्हवीची आई अभिनेत्री श्रीदेवीच आकस्मित निधन झालं. यावेळी जान्हवीने स्वतःला खूप संयमाने स्वतःला सांभाळला. 

आता एका मुलाखतीत बोलताना जान्हवीने धडकच्या सेटवरील एक प्रसंग शेअर केला. सेटवर तिला श्रीदेवीचा भास झाला असल्याच म्हटलं आहे. सीन पुन्हा पाहताना तिला असं वाटलं की, या शॉटमध्ये श्रीदेवी आहे. जान्हवीने सांगितलं की, मी माझ्या आईची मुलगी आहे. त्यामुळे मी त्याप्रमाणे दिसणारच. पण मला माहित आहे की, मी वेगळी आहे. जान्हवी आपल्या आईच्या अनेक आठवणी शेअर करताना सांगते की, माझ्या जवळपास आईचा एक असा फोटो आहे ज्यामध्ये ती अगदी सकाळी ज्यूस पिताना दिसते. मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा आई माझ्या जवळच असल्याचा मला भास होत आहे. 

धडक हा मराठी सिनेमा सैराटचा रिमेक आहे. चाहते या सिनेमाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. धडकमधून जान्हवी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे.