'याठिकाणी सर्रास लैंगिक भेदभाव होतो..' दिया मिर्झाकडून खुलासा

काय म्हणाली दिया? 

Updated: May 12, 2021, 06:54 PM IST
'याठिकाणी सर्रास  लैंगिक भेदभाव होतो..'  दिया मिर्झाकडून खुलासा

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा सध्या जोरदार चर्चेत आहे. आधी दुसऱ्या लग्न, त्यांनंतर गरोदरपणामुळे, पण आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने बॉलिवूडध्ये होणाऱ्या लैंगिक भेदभावावर एक मोठा खुलासा केला आहे. फिल्म इंडस्ट्री दिसायला झग-मगती असली तरी आतून ती तेवढीचं काळी आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचबद्दल उघडपणे सांगितलं आहे. आता दियाने बॉलिवूडमधील लैंगिक भेद होत असल्याचा दावा केला आहे. 

नुकताचं ब्रुट इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत दियाने बॉलिवूडमधील लैगिंक भेदभावाचा खुलासा केला आहे. 'लोक सेक्सिस्ट चित्रपटासाठी लिहित होते. मी देखील त्यांच्यासोबत काम केलं आहे. तेव्हा मेकअप आर्टिस्ट हा पुरूषचं असायचा.  हेअर ड्रेसरचं काम एक महिलांकडे असायचं. फार कठीण काळ होता.'

पुढे दिया म्हणाली 'ज्यावेळी मी बॉलिवूडमध्ये काम करायला सुरूवात केली तेव्हा सेटवर 120 क्रू मेंबर असायचे ज्यामध्ये फक्त 4 ते 5 महिला असायच्या. आपण आपण पितृसत्ताक समाजात राहतो आणि या इंडस्ट्रीमध्ये पुरुष नेतृत्व करतात. म्हणून याठिकाणी सर्रास  लैंगिक भेदभाव होतो..'

वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत दिया मिर्झा विवाह बंधनात अडकली आहे. दियाचं हे दुसरं लग्न आहे. महत्त्वाचं  म्हणजे दिया लवकरचं आई होणार आहे. जेव्हा तिने आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली तेव्हा तिला ट्रोल करण्यात आलं होतं. पण यावर दियाने नेटकऱ्याना सडेतोड उत्तर दिलं.