मुंबईत सोमवारी होणार श्रीदेवींवर अंत्यसंस्कार

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2018, 07:47 PM IST
मुंबईत सोमवारी होणार श्रीदेवींवर अंत्यसंस्कार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

मुंबईत अंत्यसंस्कार

श्रीदेवी यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 12 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 9 ते 11.30 पर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुबईहून त्यांचं पार्थिव शरीर आज रात्री 9 वाजता मुंबईत येण्याची शक्यता आहे. दुबईमध्येचं त्यांचं पोस्टमॉर्टम केलं गेलं.

दुबईत मृत्यू

सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवार रात्री 11 वाजेच्या दरम्यान श्रीदेवी हॉटेलच्या बाथरूममध्ये पडल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ राशिद रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दुबईतील प्रसिद्ध जुमेराह इमीरात हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या.

अचानक एक्झिट

श्रीदेवी या आपल्या कुटुंबियांसोबत एका विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवींच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.